घरक्राइममुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, घातपाताचा प्रयत्न उघड

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, घातपाताचा प्रयत्न उघड

Subscribe

गाडीत २५ जेलेटिनचे स्टिक्स मिळाले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया हाऊस बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांना आढळली आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक पथकही दाखल झाले असून या गाडीची तपासणी करण्यात आली. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक विभागाची टीमदेखील याठिकाणी हजेरी झाल्याची माहिती आहे. सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील हेदेखील घटनास्थळी पोहचले असल्याचे कळते. या स्कॉर्पिओ गाडीमध्ये २५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्याचे कळते.  मुकेश अंबानींच्या घराबाहेरच जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेला साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे ही मुंबई पोलिसांनी ही कार टो करून पुढे नेऊन या गाडीची तपासणी केली आहे.

 

- Advertisement -

बुधवारपासूनच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी होती अशी माहिती. ही बाब संशयास्पद आढळल्याने तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी प्रथमदर्शनी या गाडीमध्ये स्फोटके आढळल्याचे कळते. अंबानीच्या ताफ्यातील सुरक्षेच्या कारपैकीच एक नंबर हा स्कॉर्पिओला वापरण्यात आला आहे. अंबानींच्या सुरक्षेतील टीमने स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घातपाताच्या उद्देशानेच ही गाडी याठिकाणी ठेवली असल्याचे कळते.

- Advertisement -

लवकरच यामागील सत्य उघड होईल – अनिल देशमुख

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडली स्फोटकांनी भरलेली गाडी; लवकरच यामागील सत्य उघड होईल – अनिल देशमुख

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, February 25, 2021

 

या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. या गाडीमध्ये अंबानीच्या नावे एक धमकीचे पत्रही सापडले असल्याचे कळते. याआधीच मुकेश अंबानी यांच्या नरीमन पॉईंट येथील कार्यालयात धमकीचे पत्र आले होते. त्यानंतरच मुकेश अंबानी यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. राज्याचे गृह विभागाचे राज्यमंत्री शंभू राजे देसाई यांनीही घटनास्थळाहून माहिती घेतली आहे. त्यांनीही या प्रकरणातील मुळाशी कोण आहे याचा शोध घेऊ असेही त्यांनी सांगितले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -