Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमSuicide : तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा; डॉक्टर पित्याच्या प्रयत्नांना दहा महिन्यानंतर यश

Suicide : तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा; डॉक्टर पित्याच्या प्रयत्नांना दहा महिन्यानंतर यश

Subscribe

शिवडी येथील अभिनव अनिलकुमार सपारे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी आरके मार्ग पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयास मानू राय आणि सुनिल संघाई अशी या चौघांची नावे आहेत.

मुंबई : शिवडी येथील अभिनव अनिलकुमार सपारे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी आरके मार्ग पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयास मानू राय आणि सुनिल संघाई अशी या चौघांची नावे आहेत. (case against four in youth suicide case; doctor father’s efforts succeeded after ten months)

या चौघांकडून अभिनव अनिलकुमार सपारे याला मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीसह कामाच्या अतिरिक्त तणावामुळे अभिनवने आत्महत्या केली. याविरोधात त्याच्या डॉक्टर पित्याने आरोपींविरोधातील कारवाईसाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका धाव घेतली. अखेर दहा महिन्यांनंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार बंगलोरचे डॉक्टर असून ते एका खासगी रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. अभिनव हा त्यांचा मुलगा असून तो एका खासगी कंपनीत कामाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Accident News : दारु पिऊन मौजमजा जीवावर बेतली; भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अभिवच्या कंपनीत चारही आरोपी त्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मुंबईत नोकरी करत असल्या कारणाने अभिनव हा त्याच्या काही मित्रांसोबत शिवडीतील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून त्याला त्याच्याच या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्रास दिला जात होता. त्याच्यावर कामाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. कामावरून त्याला अपमानास्पद वागणूक दिली जात होती. याबाबत त्याने त्याच्या वडिलांशी चर्चा देखील केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे अभिनव हा मानसिक नैराश्यात होता. यातूनच त्याने 6 जानेवारी 2024 रोजी तो रहात असलेल्या इमारतीच्या 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती.

- Advertisement -

या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली होती. या याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशावरुन आरके मार्ग पोलिसांनी प्रतीक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयांस राय आणि सुनिल संघाई यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (case against four in youth suicide case; doctor father’s efforts succeeded after ten months)

हेही वाचा – Politics : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं तर…; काय म्हणाले बावनकुळे?


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -