Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमSuicide : महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; कौटुंबिक वादातून घरातच घेतला गळफास

Suicide : महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; कौटुंबिक वादातून घरातच घेतला गळफास

Subscribe

मुंबई : घाटकोपर येथे राहणार्‍या श्रद्धा तेजस सावंत या 24 वर्षांच्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजस जयवंत सावंत, तेजश्री जयवंत सावंत आणि जयवंत सावंत अशी या तिघांची नावे आहेत. यातील तेजस हा श्रद्धाचा पती तर तेजश्री आणि जयवंत हे सासू-सासरे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार तरुण डोंबिवली येथे राहत असून भारतीय रेल्वेत कामाला आहे. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले असून श्रद्धा ही त्याची बहीण आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिचे तेजस सावंत याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर ती तेजसच्या घाटकोपर येथील घरी गेली होती. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांत त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले होते. (case against three in woman’s suicide case; hanged himself at home due to a family dispute)

हेही वाचा : Cidco Lottery 2024 : ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील अटी शिथिल, अर्जालाही मुदत वाढ 

- Advertisement -

श्रद्धासोबत प्रेमसंबंध असताना तेजसची इतर काही तरुणींशी मैत्री होती. त्यांचे काही फोटो त्याच्या मोबाइलमध्ये श्रद्धाने पाहिले होते. याच कारणावरुन त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. सतत होणार्‍या वादानंतर श्रद्धाला त्याच्या भावाने त्याच्या राहत्या घरी आणले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तिथे तेजस आला. त्याने मद्यप्राशन केले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. या भांडणानंतर श्रद्धाने तिच्या राहत्या घरातील सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तिला तिच्या भावासह तेजसने अडविल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर त्यांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा तिच्या सासरी पाठवून दिले होते.

24 नोव्हेंबरला तेजस आणि श्रद्धा यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्यात जयवंत सावंत यांना छातीत दुखू लागले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाख करण्यात आले होते. यावेळी तिची सासू तेजश्रीने तिला जयवंत यांचे बरे-वाईट झाल्यास तिला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. सतत होणारे वाद, सासूची धमकी आणि पतीसह सासर्‍याकडून झालेल्या मारहाणीला कंटाळून तिने रात्री उशिरा तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार समजताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी श्रद्धाच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सासर्‍याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -