घरताज्या घडामोडीमनसे नेत्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण; गुन्हा दाखल

मनसे नेत्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण; गुन्हा दाखल

Subscribe

अंबरनाथमध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनसेचे स्थानिक नेते सुमेध भवार आणि त्यांच्या साथीदारांनी काल रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा युवक अध्यक्ष सचिन अहिरकर यांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सुमेध भवार यांनी सचिन अहिरकर यांना फोन करून अंबरनाथ (प) येथील कल्पना हॉटेलजवळ बोलवले होते. सचिन अहिरकर त्या ठिकाणी पोहोचले असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी माझ्याशी अरे-कारेने कसा बोलतोस असा जाब सुमेध भवार याने सचिनला विचारला. या नंतर दोघांमध्ये वाद झाला असता भवार याने दगड उचलून सचिनच्या डोक्यावर प्रहार केला, तर भवारचा बॉडीगार्ड रितेश सिंग याने स्टीलची टाकी उचलून सचिनला फेकून मारली. त्यानंतर अन्य बॉडीगार्ड्सने देखील सचिनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ulhasnagar beating case
सचिन अहिरकर

सचिन अहिरकर गंभीर जखमी

या मारहाणीत सचिन अहिरकर गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सचिनने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी सुमेध भवार आणि त्याच्या ६ बॉडीगार्ड्स विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

sumedh bhawar
सुमेध भवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -