घरक्राइमलाईफलाईन हॉस्पिटल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांविरोधात गुन्हा दाखल

लाईफलाईन हॉस्पिटल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सुजित पाटकरांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार सुजित पाटकर यांच्याविरोधात मुंबईतील लाईफलाईन हॉस्पीटल घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात सुजित पाटकर यांच्यासह अनेकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

यामुळे आता संजय राऊत यांच्याप्रमाणे सुजित पाटकर देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुजित पाटकर यांच्याविषयी तक्रार करत कारवाई केली जात नसल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, संजय शाह आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात 38 कोटींच्या आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय देखील ईडीच्या रडारवर आहेत.

- Advertisement -

कोरोना काळात बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने अवैध्यरित्या पद्धतीने कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अपुऱ्या क्षमतेतील कोविड सेंटरमुळे अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता.

या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सोमय्यांनी म्हटले की, शिवसेना खासदार संजय राऊत हे भागिदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वातच नाही.परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.


हेही वाचा : गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडीचे विघ्न टळणार?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -