घरमुंबईडेंग्यूच्या अळ्या नष्ट न केल्याने २० जणांवर खटले

डेंग्यूच्या अळ्या नष्ट न केल्याने २० जणांवर खटले

Subscribe

सध्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याला वेळीच आवर घालण्यासाठी अशा प्रकारच्या ठोस कारवाईची गरज निर्माण झाली होती.

पुणे : अनेकदा नोटीस देऊनही डेंग्यूच्या अळ्या नष्ट न केल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने 20 जणांवर खटले दाखल केले आहेत. सध्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याला वेळीच आवर घालण्यासाठी अशा प्रकारच्या ठोस कारवाईची गरज निर्माण झाली होती.

जानेवारीपासून ही आतापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे. हे खटले महापालिकेच्या कोर्टात दाखल केले असून त्यावर सुनावणी होऊन संबंधितांना दंड करण्यात येणार आहे. सध्या ऊन-पाऊस असे वातावरण असल्याने हे वातावरण डेंग्यूच्या निर्मितीसाठी पोषक आहे.

- Advertisement -

पालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, नागरिकांना अनेकदा डेंग्यूची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यास सांगूनही ती केली जात नाही. त्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे दंड करुनही न ऐकणार्‍यांवर आम्ही खटले दाखल करतो. बांधकाम साईट्स, बस डेपो, सोसायट्यांमधील परिसर या ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती स्थळे आढळतात.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -