Homeक्राइमTorres Company Fraud : 6 टक्के परताव्याचे आमिष; कोटींच्या फसवणुकीप्रकरणी पाच जणांविरुद्ध...

Torres Company Fraud : 6 टक्के परताव्याचे आमिष; कोटींच्या फसवणुकीप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

Subscribe

मोजोनाईट नावाचा खडा खरेदी करून त्यावरील गुंतवणुकीवर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे.

मुंबई : मोजोनाईट नावाचा खडा खरेदी करून त्यावरील गुंतवणुकीवर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या टोरेस कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकार्‍याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Case registered against five people in connection with Torres company fraud of crores)

सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवलेंको, तौफिक रियाज कार्टर, तानिया कसतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार अशी या पाच जणांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते सर्वजण पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. मुंबईसह इतर ठिकाणी कंपनीची शाखा असून त्यात सुमारे अडीच ते तीन लाख गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवणूक केली आहे. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

31 वर्षांचे प्रदीपकुमार मामराज वैश्य हे खार परिसरात राहत असून त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. जून 2024 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत त्यांनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली होती. या कंपनीचे दादर येथील जे. के सावंत मार्ग, टोरेस वस्तू सेंटर इमारतीमध्ये एक कार्यालय आहे. कंपनीने मोजोनाईट हा खडा खरेदी करून त्यावर गुंतवणूक केल्यास आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळे प्रदीपकुमार यांनी कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना यांच्या सांगण्यावरून मोजोनाईक खड्यासाठी गुंतवणूक केली होती.

हेही वाचा – Baba Siddique Murder : मुंबईत दहशत कायम राहावी म्हणून…बाबा सिद्दिकींना मारण्याचे कारण आले समोर… 

- Advertisement -

या गुंतवणुकीनंतर त्यांना कंपनीकडून आठवड्याला सहा टक्के व्याजदर दिला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने व्याजदाराची रक्कम देणे बंद केली होती. त्यामुळे ते दादर येथील कंपनीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना कंपनीला टाळे असल्याचे समजले तसेच गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडलेले इतर गुंतवणुकदारही मोठ्या प्रमाणात कार्यालयाबाहेर जमा झाले होते.

सुरुवातीला सर्वांना परतावा दिल्यानंतर कंपनीने त्यांना परतावा देणे बंद केले होते. अशा प्रकारे कंपनीने जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत आतापर्यंत अनेकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची 13 कोटी 48 लाख 15 हजारांची फसवणूक केली होती. सायंकाळी या गुंतवणुकदारांनी दादरच्या कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी प्रदीपकुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टोरेस कंपनीचे संचालक, सीईओ, महाव्यवस्थापक आणि स्टोर इंचार्ज अशा पाच जणांविरुद्ध गुंतवणुकदारांकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – Crime : गृहपाठाच्या भीतीने 11 वर्षाच्या मुलांनी रचली अपहरणाची कथा, पण…; असा झाला उलगडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -