घरमुंबईSushant Case : सीबीआयची टीम सुशांतच्या घरी दाखल; सखोल तपास सुरू

Sushant Case : सीबीआयची टीम सुशांतच्या घरी दाखल; सखोल तपास सुरू

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आता तपास सीबीआयच्या हातात आला आहे. काल, शुक्रवारपासून मुंबईमध्ये सीबीआयने तपासाला सुरूवात केली असून आज त्यांची टीम सुशांतच्या वांद्रे येथील निवासस्थानी दाखल झाली. सीबीआयसोबत फॉरेन्सिक विभागातील अधिकाऱ्यांची टीमदेखील या ठिकाणी तपास करत असल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या पाच दिवसांपूर्वी सुशांतची केस सीबीआयच्या ताब्यात देण्याचा निर्यण सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर दिल्लीतील ही पाच जणांची स्पेशल टीम मुंबईत दाखल झाली. या प्रकरणी मुंबई तसेच बिहार पोलिसांनी यापूर्वी तपास केला असून आता काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देखील यातील कथिक आरोपी रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली होती.

- Advertisement -

कालपासून सीबीआयने त्यांचा तपास सुरू केला आहे. शुक्रवारी सकाळी सीबीआयने सर्वातआधी सुशांतचा स्वयंपाकी निरजची चौकशी केली. त्याचा जबाब नोंदवून घेण्यासाठी त्याला गेस्टहाउसला नेण्यात आले होते. तीन तासांहून जास्त काळ ही चौकशी सुरू होती. सीबीआयचे अधिकारी सुशांतचा मित्र व मॅनेजर सिद्धार्थ पिठानी आणि स्वयंपाकी निरज यांना घेऊन सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

- Advertisement -

सुशांतच्या मृत्यूला तब्बल दोन महिने उलटून गेले आहेत. या दोन महिन्यात विविध अंगांनी या केसची तपासणी झाली. मुंबई आणि बिहार या दोन्ही राज्यातील पोलिसांकडून कसून चौकशी केल्यानंतर ईडी आणि आता सीबीआय या प्रकरणी तपास करत आहे सीबीआयला प्रथम सुशांतसिंह राजपूत याचा खून झाला का हे शोधावे लागणार आहे. हत्येशी संबंधित काही तथ्ये आढळतात का याचा तपास करताना सीबीआय घटनास्थळाची कसून तपासणी करणार आहेत. त्याच प्रमाणे गुन्ह्याचा तपास, शवविच्छेदनाचा अहवाल आणि फॉरेन्सिक तपास केला जाईल. या सोबतच सीबीआयला मुंबई पोलिसांकडूनही काही तपशील मिळवावा लागणार आहे. त्याच प्रमाणे सीबीआय टीमला तांत्रिक, फॉरेन्सिक आणि टीएफसीची मदत घ्यावी लागेल. तसेच सुशांतसिंह याच्या घरी पुन्हा तो क्राइम सीन क्रिएट करणार आहे.

हेही वाचा –

मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस: समुद्रात ४.६७ मीटर उंच लाटा उसळणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -