घरमुंबईकारागृहाच्या आवारात सीसीटीव्हीची नजर

कारागृहाच्या आवारात सीसीटीव्हीची नजर

Subscribe

पुण्यात तुरुंगाधिकार्‍यांवर झालेल्या गोळीबाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने १२ मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

पुण्यात तुरुंगाधिकार्‍यांवर झालेल्या गोळीबाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने १२ मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तसेच तुरुंगाच्या आवारात संशयास्पद फिरणार्‍या व्यक्तींवर सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाणार आहे.                                                                                                              पुण्यातील येरवडा कारागृहातील तुरुंगाधिकार्‍यांवर दोन तरुणांनी गोळीबार केला होता. त्या तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या आरोपींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून प्रशासनाने १२ मार्गदर्शक तत्वे आणि काही सूचना जारी केल्या आहेत. राज्यात ९ मध्यवर्ती, ३१ जिल्हास्तरीय तर १३ खुली कारगृहे आहेत. या सर्व कारागृहांतील कर्मचारी, अधिकार्‍यांना ही मार्गदर्शक तत्वे आणि सूचना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. कारागृहाच्या बाहेर परिसरात संशयास्पद वावरणार्‍या लोकांवर सीसीटीव्हीमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. अशा व्यक्तींची माहिती स्थानिक पोलिसांना पुरविण्यात येणार आहे. या सूचना अप्पर पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिल्या आहेत.

काही मार्गदर्शक सूचना

१) तुरुंग कर्मचार्‍यांनी काठी आणि हातकडीसह हॅल्मेट सोबत बाळगावे.
२) कैद्यांना बाहेर काढताना अधिकारी,कर्मचार्‍यांनी एकटे जाऊ नये.
३) सकाळी सहा ते आठ या ओपनिंगच्यावेळी कारागृहासमोर दोन्ही बाजूंनी 50 फूट बॅरिकेटस करावे.
४) तुरुंग प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या नियमित संपर्कात राहावे.
५) तुरुंग अधिकार्‍यांनी सोबत शस्त्र बाळगावे. ओपनिंगला जाताना एकटे जाऊ नये.
६) कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हत्यारबंद पोलीस गार्ड ठेवावेत.
७) त्यांचे मनुष्यबळ कमी असल्यास त्वरित वरिष्ठांना त्याची माहिती देऊन तशी नोंद करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -