मुकी जनावरं आणि पाळीव प्राण्यांसाठी मुंबईत शवदाहिनी उभारणार – महापौर किशोरी पेडणेकर

अडीच हजार सेक्वेअर फुटाच्या जागेमध्ये दहिसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी बांधण्यात येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Mumbai mayor kishori pednekar slams bjp and chitra wagh on animal english name

मुंबईतील रस्त्यावर काही वेळेस मुकी जनावरं किंवा पाळीव प्राणी मृत अवस्थेत पडलेली दिसतात. अशा प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही खासगी स्मशानभूमी आहेत. पण तिथे देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. याच अनुषंगाने आता मुंबईत पाळीव प्राण्यासाठी स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. दहिसरमध्ये प्राण्यांसाठी शवदाहिनीची सोय करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘मुकी जनावरं आणि पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी कुठेत नाहीत आणि ज्या आहेत, त्या बऱ्याशा खासगी आहेत. त्यामुळे अनेकदा आपल्याला वाट पाहावी लागते आणि त्या वाट पाहण्यामध्ये आपण नाही म्हटले तर बराच वेळ जातो. आपले लाडके घरातले सदस्य म्हणून आपण मुकी जनावर, मुक्या प्राण्यांचे पालन करतो आणि त्याच्या जाण्याच्या दुःखात असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात खूप वेळ जात असेल तर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे दहिसर येथे स्मशानभूमीत पाळीव प्राण्यासाठी शवदाहिनी बांधण्याबाबतचा पक्का निर्णय झाला आहे. याबाबतचे परिपत्रक निघाले असून आज अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या येथे पहिल्यांदा पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी बांधण्यात येणार आहे.’

पत्रकार परिषदेत महापौर पेडणेकर यांनी प्राण्याची स्मशानभूमी कशा पद्धतीने असणार आहे, याचे मॉडेल दाखवले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक शवदाहिनी असणार आहे. तसेच जुन्हा पद्धतीने धुरांडा त्यावर असणार आहे. अडीच हजार सेक्वेअर फुटाच्या जागेमध्ये पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.


हेही वाचा – मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी ‘गोड’ करणार; यासाठी ११ कोटींचा नेमणार सल्लागार