घरताज्या घडामोडीरविवारी ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर, मध्य व हार्बर रेल्वे धावणार

रविवारी ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर, मध्य व हार्बर रेल्वे धावणार

Subscribe

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दर रविवारी मेगाब्लॉकमुळे गर्दीचा सामना कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दर रविवारी मेगाब्लॉकमुळे गर्दीचा सामना कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Central and Harbor Railways will run but Mega Block on Trans-Harbour route Sunday)

हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे येत्या रविवारी (२८ मे) ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळ या स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्यानुसार, सकाळी ११.१० वाजल्यापासून ते दुपारी ०४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

- Advertisement -

अप मार्गावरील सेवा रद्द

ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकच्या कालावधीत ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ०४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील लोकल गाड्या आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Samruddhi Highway : ‘अनेकांना ही केवळ घोषणा…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -