घरमुंबईमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Subscribe

 

मुंबईः मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या, रविवारी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे सीएसएमटी ते पनवेल मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच प्रवास करायला हवा. मात्र पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने तेथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

रुळांची दुरुस्ती, देखभालीसाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामांसाठी रेल्वने हा मेगाब्लॉक घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.ठाण्याहून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान  धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून  सकाळी 11.16 ते सायंकाळी  4.47 या वेळेत तसेच वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी सेवा रद्द करण्यात आली आहे.  तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी  4.43 वाजेपर्यंत  वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. तसेच ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ल्या दरम्यान विशेष सेवा सुमारे २०  मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -