मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ, पण सर्वसामान्यांना नो एंट्री

central and western railway rounds will be increase
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ, पण सर्वसामान्यांना नो एंट्री

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यामध्ये येत्या शुक्रवारपासून वाढ होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने २०४ फेऱ्या वाढवलेल्या आहेत. पण मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यात जरी वाढ झाली असली तरी सरकारने सर्वसामान्यांसाठी रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा अजूनही दिली नाही आहे. त्यामुळे फेऱ्यात वाढ झाली म्हणून विनाकारण सर्वसामान्यांनी स्टेशन गर्दी करू नका, असे आवाहन रेल्वे प्रशासने केले आहे.

कोरोना काळ सुरुवात झाल्यामुळे गेले कित्येक महिने मुंबईकरांची लाईफ लाईन बंद होती. पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईकरांची लाईफ लाईन फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू करण्यात आली. आता मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गावर रेल्वे पूर्ण क्षमतेत धावणार आहे. दोन्ही मार्गावरील रेल्वेच्या फेऱ्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने सध्या सुरु असलेल्या १ हजार ५८० फेऱ्यांमध्ये आता १०५ फेऱ्यांची भर घातली आहे. म्हणजेच शुक्रवारपासून मध्य रेल्वेने एकूण १ हजार ६७५ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने सध्या सुरु असलेल्या १ हजार २०१ फेऱ्यामध्ये ९९ फेऱ्यांची वाढ केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर २९ डिसेंबरपासून १ हजार ३०० फेऱ्या सुरू होणार आहेत. सध्या जे अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी आहेत, तेच प्रवासी वाढत्या फेऱ्याचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणतेही कारण नसताना स्टेशनवर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


हेही वाचा – डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरी द्या – मनसे