घरदेश-विदेशमध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी  टाळण्यासाठी,अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी  टाळण्यासाठी,अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय

Subscribe

.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळ्यासाठी अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खाली दिल्यानुसार:

 

- Advertisement -

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष

०१२४९छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २९ एप्रिल २०२१ रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूरला येथे तिसर्‍या दिवशी ०५.०५ वाजता पोहोचेल.

- Advertisement -

०१२५०विशेष गोरखपूर येथून दि. १ एप्रिल २०२१ रोजी ०९.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी.

२. लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष एकमार्गी (वन वे)

०१२५३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २८ एप्रिल २०२१ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी हावडा ११.३५ वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर. टाटानगर, खडगपूर.

संरचनाः २ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.

 

३. मुंबई-गुवाहाटी विशेष एकमार्गी (वन वे)

०१२५५ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २८ एप्रिल २०२१ रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि गुवाहाटी येथे चौथ्या दिवशी ०१.२० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., पाटलीपुत्र, बरौनी, कटिहार, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू बोंगाईगाव, रंगिया.

संरचना : – १ तृतीय वातानुकूलित, १९ शयनयान.

आरक्षणः पूर्णपणे आरक्षित

०१२४९,०१२५३आणि ०१२५५ या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २६ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


हे हि वाचा – म्हणूनच महाराष्ट्राच्या Oxygen Express चा ‘ग्रीन कॉरिडॉर’ गुजरातमार्गे वळवला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -