घरमुंबईमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सायन माटुंगा दरम्यान रुळाला तडे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सायन माटुंगा दरम्यान रुळाला तडे

Subscribe

सायन - माटुंगा स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन – माटुंगा स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. रात्रीच्या ९ वाजून १० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. तर मुंबईकडे येणारी वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या याठिकाणी रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -