घरCORONA UPDATEमध्य रेल्वेचं हॉस्पिटल युद्ध स्तरावर करतंय कोरोनाग्रस्तांची सेवा

मध्य रेल्वेचं हॉस्पिटल युद्ध स्तरावर करतंय कोरोनाग्रस्तांची सेवा

Subscribe

भायखळा येथील मध्ये रेल्वेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल २४ × ७ सर्व प्रकारच्या कोविड आणि कोविड नसलेल्या रूग्णांसाठी झटत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलची टिम कोविड १९ विरूद्ध युद्ध स्तरावर लढत आहे. कोविड १९ साथीची जगभरातील स्थिती पाहता भारतातही उद्रेक होताना भायखळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तयारीला सुरुवात केली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व जागतिक आरोग्य संघटना यांच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार व्हेंटिलेटर कार्यशाळा, पीपीईचे डोनींग आणि डॉफिंग, संक्रमण प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना, व्यवस्थापनासाठी प्रोटोकॉल इत्यादींसह डॉक्टर आणि कर्मचार्‍यांसह सर्वांना सघन आणि वारंवार प्रशिक्षण देण्यात आले.

दिल्लीहून थेट कार्यक्रमाद्वारे भायखळा व कल्याण रेल्वे रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांसाठी नोवेल कोरोना व्हायरस संसर्गावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. बाह्य रूग्ण विभाग प्रतिक्षालय आणि वॉर्डांमध्ये दूरदर्शनवर (TV) व्हिडिओ क्लिप्स लावण्यासह पोस्टरच्या प्रदर्शनाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. रूग्णांच्या निकषांनुसार, रूग्णालयाच्या एकूण बेडपैकी १० टक्के बेड्स चिन्हांकित केली गेली आणि रुग्णालयाच्या इतर भागांना सोडून दुसऱ्या मजल्यावर डोनींग, डॉफिंग क्षेत्रे इत्यादीसह प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे दरवाजे असलेला वेगळा अलगीकरण वॉर्ड तयार केला गेला. ऑक्सिजन सिलेंडर्स, पोर्टेबल एक्स रे मशीन, थर्मामीटर, स्टेथोस्कोप, सॅनिटायझर्स इत्यादी सर्व आवश्यक उपकरणे स्वतंत्र नर्सिंग स्टेशन, डॉक्टरांच्या खोली इत्यादींसह येथे व्यवस्था केली गेली आहे.

- Advertisement -

 

कोविड साथीत पायाभूत सुविधा आणि २४ × ७ सर्व प्रकारच्या कोविड आणि कोविड नसलेल्या रूग्णांना हाताळण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांसाठी कठोर प्रशिक्षण विकसित करणे मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. वाय.एस. अटारिया आणि भायखळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. मीरा अरोरा यांच्या डायनॅमिक नेतृत्वात कार्यरत डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्सच्या समर्पित टीममुळेच शक्य झाले आहे. कल्याण, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथील विभागीय रेल्वे रुग्णालयांनी डॉक्टर व पॅरामेडिक्सना प्रशिक्षण दिले आहे जेणेकरून सर्व प्रकारच्या रुग्णांना चोवीस तास सेवा देता येईल.

- Advertisement -

रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नवीन मोबाइल नंबर तसेच लँड लाइन नंबरची तरतूद असलेले नियंत्रण कक्ष स्थापिण्यात आले आहे. त्याचबरोबर कोविड १९ मध्ये सर्व रूग्णांना संपर्क होण्याच्या पहिल्या टप्प्यावर ओळखण्यासाठी व त्यानुसार वेगळे करण्यासाठी समर्पित फ्लू ओपीडी सुरू केली गेली आहे आणि रुग्णालयाच्या मुख्य गेटच्या प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे.

central railway hospital - Copy

लॅबचे एम्पॅनलींग करून कोविड १९ चाचणी सुविधा सुरू केल्या आहेत आणि डायलिसिस, केमोथेरपी, रेडिओथेरपी, गर्भवती व प्रीऑपरेटिव्ह सर्जिकल केसेस आणि पॉझिटिव्ह केसेसच्या संपर्कांच्या अंतर्गत घरातील रूग्णांवर नियमित चाचण्या घेतल्या जात आहेत. भायखळा रुग्णालयाने विभागीय रेल्वे रुग्णालये, कल्याण आणि पुणे येथे चाचणी सुविधांसाठी यशस्वीरित्या टाय-अप केले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालय एक समर्पित कोविड सेंटर ठरण्यासाठी मदत केली आहे. कोविड रूग्ण तसेच संशयित कोविड रूग्णांच्या वाहतुकीसाठी एक समर्पित रुग्णवाहिका ठेवली आहे.

भायखळा हॉस्पिटल केवळ मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच नव्हे तर इतर क्षेत्रांतील (Zonal Railway) नॉन-कोविड बाह्य रूग्ण विभाग, आंतर रूग्ण आणि आपात्कालीन प्रकरणांचीही जबाबदारी स्वीकारत आहे. मे २०२० च्या अखेरपर्यंत मध्य रेल्वेच्या सर्व ओपीडी व इनडोर प्रकरणांव्यतिरिक्त व इतर क्षेत्रांतील संदर्भित सर्व प्रकरणे तसेच पश्चिम रेल्वेच्या १००० हून अधिक नॉन-कोविड रूग्णांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलने उपचार केले आहेत. एप्रिल २०२० पासून आजपर्यंत एकूण २३०३ आपत्कालीन रूग्णांना २४×७ उपचार केले आहेत.

हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी (एचआयसीसी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कोविड इन्फेक्शन कंट्रोल प्रक्रियेचे अत्यंत दक्षतेने पालन होत आहे याची खात्री करुन प्रत्येकजण दक्षतेने सेवा देत आहे. मुखपट्ट्यांचा अनिवार्य वापर हे केवळ आरोग्य सेवा कामगारच नव्हे तर ओपीडी आणि इनडोअर रूग्ण आणि त्यांचे परिचारकही पाळत आहेत, सॅनिटायझर्सचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, शैक्षणिक पोस्टर्स व संकेत दाखवणे, कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे.

भायखळा रुग्णालय एकाच वेळी नवीन अतिरिक्त कोविड सेवा क्षेत्रांची जसे २४×७ कोविड ओपीडी, २४×७ कोविड कॅज्युलिटी, २४×७ कोविड विलगीकरण केंद्रे, २४×७ कोविड लक्षणे असलेले रूग्ण वॉर्ड, २४×७ कोविड रुग्णवाहिका सेवा तसेच कोविडची चाचणी सुविधा सारखे मोठे-कर्तव्य व उच्च-जोखीम जबाबदारी देखील हाताळत आहे. सर्व पूर्व-पश्चात वर्कअप तसेच समर्पित कोविड केंद्रांमधून सोडण्यात आलेल्या अथवा परतलेल्या रूग्णांचे व्यवस्थापन आणि सर्व आवश्यक उपचारांची योग्य प्रकारे व्यवस्था केली जात आहे.

central railway hospital

दररोज अद्ययावत अहवाल तयार करण्यासाठी आणि महानगरपालिका अधिका-यांशी विलगीकरण, ट्रेसिंग आणि कंटेंमेंट उद्देशासाठी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त असे दररोज कोविडशी संबंधित सर्व क्रियाकलापांची माहिती प्रविष्ट करण्यासाठी डॅशबोर्डसह एक मजबूत हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कार्यरत आहे.

कल्याण येथील टिम वेळेवर आपत्कालीन ऑपरेशन करते आणि जीव वाचवते

सुरेखा देवी नावाच्या एका रूग्णाची तब्येत गंभीर असून तिला पोटात दुखत होते. एका खाजगी रुग्णालयाने तिला जीवघेणा ट्यूबल प्रेग्नंसी असल्याची माहिती दिली गेली. ७/८ जून च्या मध्यरात्री ति विभागीय रेल्वे रुग्णालय, कल्याणला येथे आली. आपात्कालीन ड्युटीच्या डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ञ डॉ. रफीकउल इस्लाम, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी यांच्यासह डॉ. युवराज चौके, विभागीय वैद्यकीय अधिकारी (एनेस्थेटिक), श्रीमती लवी बाऊ, श्रीमती एलिझाबेथ जेकब (ऑपरेशन थिएटर सिस्टर्स) आणि श्री. सचिन आवारे, ड्रेसर यांनी ताबडतोब ३० मिनिटांत ऑपरेशनची व्यवस्था केली आणि वेळेवर हस्तक्षेप करून शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचले.

कोविड साथीचा आजार पसरलेला असतानाच्या त्रासदायक काळात, विभागीय रेल्वे रूग्णालय, कल्याणच्या डॉक्टरांनी आणि पॅरामेडिक्सच्या टीमने आणीबाणीच्या वेळी अत्यंत व्यावसायिकता व कार्यक्षमता दर्शविली. श्री शलभ गोएल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांनी कल्याण रूग्णालयाच्या कार्यसंघाचे कौतुक केले. कोरोना वॉरियर्स – २४×७ काम करणारे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची एक समर्पित टीम रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी त्यांची निरंतर सेवा चोवीस तास देत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -