देशात नॉन फेअर उत्पन्नात मध्य रेल्वे आघाडीवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १९१ टक्क्यांनी वाढ

मुंबई : मध्य रेल्वेने एप्रिल-२०२२ ते फेब्रुवारी-२०३३ पर्यंत सर्व झोनमधून सर्वाधिक नॉन-फेअर उत्पन्नात आघाडीवर आहे. मध्य रेल्वेकडे यावर्षी ७८.८६ कोटी रुपये नॉन-फेअर महसूल जमा झाले आहे. मध्य रेल्वेने पार्सल ट्रॅफिकच्या माध्यमातूनही लक्षणीय उत्पन्न वाढ केली आहे.

गैरभाडे (नॉन-फेअर) महसूल
आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्ये मध्य रेल्वेची नॉन-फेअर महसूल कामगिरी ७८.८६ कोटी रुपये झाली असून ही महसूल कामगिरी गतवर्षीच्या कालावधीतील २७.१० कोटी रुपयांच्या तुलनेत प्रभावी ठरली असून १९१ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये सर्वाधिक आहे.

फेब्रुवारी-२०२३ मधील महत्त्वाचे कंत्राट आणि निविदा :
• १८ निविदा ई-लिलावाद्वारे रु.४९१.०६ लाख वार्षिक परवाना शुल्कासह देण्यात आले.
• मुंबई विभागाकडून ३ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक २४३.३० लाख रुपये उत्पन्नासह उपनगरी ट्रेनवर बाह्य विनाइल रॅपिंगसाठी ५ करार.
• मुंबई विभागाद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक रु. ५.८८ लाख उत्पन्नासह २ आऊट ऑफ होम कंत्राटे, तसेच लातूर येथे ६.७५ लाख वार्षिक उत्पन्नासह आणि पुणे विभागाद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी ५१.८० लाख रुपये उत्पन्नासह प्रत्येकी १ आऊट ऑफ होम कंत्राट देण्यात आले.
• मुंबई विभागाकडून वार्षिक रु.१२५.४४ लाख उत्पन्नासह ४ रेल्वे डिस्प्ले नेटवर्क करार.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ट्रक/टेम्पो पार्किंग तसेच स्टॅकिंग कॉन्ट्रॅक्ट ५ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक रु. ४३.५ लाख उत्पन्नासह.

पार्सल महसूल
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्ये ४.५६ लाख टन पार्सल आणि सामान वाहतूकीतून सुमारे २३२.५० कोटी (फक्त फेब्रुवारी महिन्यातील रु. १७.९६ कोटींसह) चे लक्षणीय उत्पन्न नोंदवले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये याच कालावधीत, वेळापत्रकानुसार पार्सल गाड्यांच्या २०१ फेऱ्यांमधून २४.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शालीमार पार्सल ट्रेनच्या ९९ फेऱ्यांमधून रु. १४.९७ कोटी, भिवंडी – जळगाव ते आजरा ३० इंडेंट पार्सल ट्रेनच्या माध्यमातून रु.६.२५ कोटी आणि गोधनी ते तिनसुकिया जंक्शनपर्यंतच्या लीज पार्सल ट्रेनच्या २२ फेऱ्यांमधून रु.३.५९ कोटी उत्पन्न मिळवले.
सध्या १०१ गार्ड लगेजसह द्वितीय श्रेणी (SLR) आणि १४ पार्सल व्हॅन (VP) भाडेतत्त्वावर आहेत (त्यापैकी ५० SLR आणि २ VP ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत). मागील वर्षी याच कालावधीत ७४ गार्ड लगेजसह द्वितीय श्रेणी (SLR) आणि ५ पार्सल व्हॅन (VP) भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या.