घरताज्या घडामोडीखुशखबर; गौरी गणपतीला कोकणात जाणार्‍यांसाठी रेल्वेच्या २०० फेर्‍या! 

खुशखबर; गौरी गणपतीला कोकणात जाणार्‍यांसाठी रेल्वेच्या २०० फेर्‍या! 

Subscribe

मध्य रेल्वने ११ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या २०० फेर्‍यांचे नियोजनाच्या आरखडा तयार केला आहे.

गौरी गणपतीला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी राज्य सरकारने नुकतीच रेल्वेला केली होती. त्यानुसार मध्य रेल्वने ११ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या २०० फेर्‍यांचे नियोजनाच्या आरखडा तयार केला आहे. तसा प्रस्ताव तयार करुन मध्य रेल्वेने अंतिम मंजुरीसाठी रेल्वे महामंडळाला आणि केंद्रीय गृह विभागाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला कोणत्याही क्षणी परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा  दिलासा मिळणाची शक्यता आहे.

 गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा सण आहे. या सणासाठी मुंबई, पुण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात. मात्र कोरोनामुळे आंतरजिल्हा प्रवासाला बंदी आहेत. त्यामुळे कोकणातील नागरिकांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने काही दिवसापुर्वी एसटी बसेस सोडण्यात आलेल्या आहे. मात्र एसटीच्या बसेस अपुर्‍या पडत असल्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची गैरसोय होउु नये, म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दुष्टीने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन युनिटचे संचालक अभय यावलकर यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात ट्रेन सोडण्याची मागणी मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांना एका पत्राव्दारे केली होती. त्यानुसार आता शनिवारी मध्य रेल्वे प्रशासनाने  ११ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या २०० फेर्‍यांचे  नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव तयार करुन मध्य रेल्वेने अंतिम मंजुरीसाठी रेल्वे महामंडळाला आणि केंद्रीय गृह विभागाकडे सादर केला आहे.

- Advertisement -

अशी असणार सुविधा

गणपतीसाठी कोेकणात रेल्वेच्या २०० फेर्‍या असणार आहेत. या गाड्यांना दुतीय श्रेणीचे डबे असणार आहेत. आरक्षित तिकीट असलेले प्रवासीच या गाड्यांमधून प्रवास करु शकतात.या गाड्यांमध्ये प्रवाशांना अन्नपदार्थ,ब्लॅकेट वगैरे पुरविण्यात येणार नाही.तसेच प्रवाशांना रेल्वे स्टेशन मध्ये ३ तास आधी यावे लागणार आहे. प्रवाशांची तपासणी करूनच प्रवाशांना गाडीत बसविले जाणार आहे.

गृह विभागाची मंजुरीची आवश्यकता ?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेची वाहतूक सुरु करण्यासाठी आता फक्त रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाची परवानगी आवश्यक नाही.तर केंद्रीय गृह विभागाची देखील मंजुरी आवश्यक आहे. परिणामी कोकणात जाणार्‍या २०० फेर्‍यांना गृह विभागाची मान्यता हवी. गृह विभागाने मंजुरी दिल्यानंतर  मंगळवार ११ ऑगस्ट पासून कोकणाकरिता रेल्वे धावणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -