कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वे सज्ज; अनेक गाड्या होणार रद्द

मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल धोकादायक ठरविण्यात आल्याने 22 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आता या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. या पाडकामासाठी मध्य रेल्वे सर्व यंत्रणांसह सज्ज झाली आहे.

मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल धोकादायक ठरविण्यात आल्याने 22 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आता या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. या पाडकामासाठी मध्य रेल्वे सर्व यंत्रणांसह सज्ज झाली आहे. या पुलाच्या तोडकामासाठी आवश्यक ती संपूर्ण यंत्रणा, जेसीबी, ४ अजस्त्र क्रेन, मनुष्यबळ आदी तयार ठेवण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. त्यापैकी एक क्रेन गुरुवारी तर दोन क्रेन शुक्रवारी दाखल झाल्या आहेत. (Central Railway ready for demolition of Carnac Bridge Many trains will be cancelled)
कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी (19 नोव्हेंबर) रात्री 11 वाजल्यापासून ते सोमवारी (21 नोव्हेंबर) मध्यरात्री 2 पर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे या 27 तासांच्या ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे.
कर्नाक पूल पाडण्याची तयारी आणि नियोजन तपशील :
  • मनुष्यबळ : एकूण 400 मनुष्यबळ + 30-35 अधिकारी + 100 पर्यवेक्षक
  • प्रति शिफ्ट मदतनीसांसह 50 गॅस कटर.
    एकूण अंदाजे 300 गॅस सिलिंडर वापरण्यात येतील.
  • एकूण 4 क्रेन तैनात : 350 टनाच्या 3 क्रेन आणि 500 टन क्षमतेची 1 क्रेन.
    रिलीझ मटेरियलच्या स्थलांतरासाठी 4 हायड्रा क्रेन.
  • गेल्या 3 महिन्यांत 600 घन मीटर (सुमारे 1440 टन म्हणजे सुमारे 300 ट्रक साहित्य) काँक्रीट काढण्यात आले.
    अंदाजे 450 टन वजनाची स्टीलची रचना काढण्यासाठी, 27 तासांचा मेगा ब्लॉक कार्यान्वित केला जाईल.
  • विद्यमान स्टील संरचना पुलाची लांबी/रुंदी : ५० मीटर आणि १८.८ मीटर एकूण 7 स्पॅन.
  • हे स्पॅन 44 ऑपरेशन्समध्ये काढले जातील: एका वेळी 1 पीस लिफ्टिंग. 18 तुकडे (प्रत्येकी 16 टन) + 14 तुकडे (प्रत्येकी 3 टन) + 12 तुकडे (प्रत्येकी 10 टन)
  • कुर्ला क्रेन डेपोमध्ये 140 टनांची एक रेल्वे क्रेन स्टँड बाय व्यवस्था म्हणून तयार ठेवली जाईल
  • अग्निशमन दलाला अलर्ट मोडवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • साईट मेगा फोनसह पुरेसा आरपीएफ कर्मचारी तैनात केला जाईल
  • वैद्यकीय पथकासह 2 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत
  • 6 टॉवर वॅगन OHE वायर डिस्कनेक्ट/पुन्हा जोडण्यासाठी काम करतील.

असा असेल ब्लॉक

  • अप आणि डाउन धिम्या मार्ग : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी दुपारी 4:00 वाजेपर्यंत 17 तासांचा ब्लॉक असेल.
  • अप आणि डाउन जलद मार्ग : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी दुपारी 4:00 वाजेपर्यंत 17 तासांचा ब्लॉक असेल.
  • अप आणि डाउन हार्बर मार्ग : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी दुपारी 8:00 वाजेपर्यंत 21 तासांचा ब्लॉक असेल.
  • सातवी मार्गिका आणि यार्ड : शनिवारी (19 नोव्हेंबर) रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री (21 नोव्हेंबर) 2:00 वाजेपर्यंत 27 तासांचा ब्लॉक असेल.

या मार्गावर रेल्वे सेवा बंद

  • अप आणि डाउन हार्बर मार्ग : वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
  • अप आणि डाउन धिम्या मार्गावर : भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
  • अप आणि डाउन जलद मार्गावर : भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

या रेल्वे सेवांवर परिणाम

  • ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.
  • मध्य रेल्वे मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील.
  • भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
  • हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील.
  • वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
  • रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण

शनिवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द

  • 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
  • 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
  • 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस
  • 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
  • 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
  • 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
  • 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
  • 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ

रविवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द

  • 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
  • 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  • 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस
  • 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ
  • 11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस
  • 02101 मुंबई – मनमाड विशेष
  • 12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे
  • 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस
  • 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन
  • 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
  • 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
  • 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
  • 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
  • 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
  • 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
  • 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
  • 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
  • 02102 मनमाड – मुंबई स्पेशल
  • 2072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
  • 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
  • 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस
  • 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
  • 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस

सोमवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द

  • 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
  • 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  • 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन

शनिवारी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

  • 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
  • 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

रविवारी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस
5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस
6) 12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस
7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस
8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस
9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस
13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल
15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस
17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे
18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे
19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

सोमवारी दादर येथून सुटणारी गाड्या

  • 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

रविवारी नाशिक रोड येथून सुटणारी गाड्या

  • 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या

  • 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (शनिवार)
  • 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस (रविवार)
  • 12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस (रविवार)
  • 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (रविवार)

पुणे येथून रविवारी सुटणाऱ्या गाड्या

  • 11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
  • 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
  • 16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस
  • 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस
  • 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन

शुक्रवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • 12533 लखनौ जंक्शन – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
  • 12870 हावडा – मुंबई एक्सप्रेस
  • 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
  • 11020 भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेस
  • 12810 हावडा – मुंबई मेल नागपूर मार्गे
  • 12138 फिरोजपूर – मुंबई पंजाब मेल
  • 12321 हावडा – मुंबई मेल प्रयागराज छिवकी मार्गे

शनिवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

1) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
4) 11402 आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
6) 12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस
7) 22144 बिदर – मुंबई एक्स्प्रेस
8) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं. – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
10) 12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
11) 22178 वाराणसी – मुंबई महानगरी एक्सप्रेस
12) 22222 ह. निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस
13) 22160 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
14) 22731 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस
15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस

रविवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

1) 22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.

शनिवारी सुटणारी आणि नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी

  • 22140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस (शनिवारी)
  • 12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस (शनिवारी)
  • 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस (शनिवारी)
  • 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस (रविवारी)

शनिवारी सुटणाऱ्या आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • 11140 गदग- मुंबई एक्सप्रेस
  • 12116 सोलापूर – मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस
  • 16332 तिरुवनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस
  • 11302 केएसआर बेंगळुरू – मुंबई उद्यान एक्स्प्रेस
  • 11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस (रविवारी)

हेही वाचा – कर्नाक पुलाचे २७ तास तोडकाम; प्रवाशांसाठी बेस्टची पर्यायी व्यवस्था