मुंबई : 25 डिसेंबर, नाताळ या सणानंतर सर्वांमध्ये फिवर चढतो तो थर्टी फर्स्टचा. मुंबईकरांसह सर्वजण थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटन स्थळ गाठत आहेत. याशिवाय मुंबईत असलेल्या अनेक आकर्षक ठिकाणी उपनगरांमधून येणाऱ्या नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे थर्टी पार्टीनंतर या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे चार विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. (central railway will run four special local on 31st midnight at tuesday)
नवीन वर्षांसाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे, तर पुणे, रायगड आदी भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
या नागरिकांसाठी मध्य रेल्वे चार विशेष गाड्या चालवणार आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 4 विशेष उपनगरीय सेवा चालवणार आहे. त्यानुसार, मंगळवार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आणि बुधवार 1 जानेवारी पहाटेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
४ विशेष उपनगरीय सेवा
मुख्य लाइन
- 31/12/24 – 1/1/25 च्या मध्यरात्री मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण या मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1:30 वाजता सुटणारी लोकल पहाटे 3:00 वाजता कल्याण येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल.
- 31/12/24 – 1/1/25 च्या मध्यरात्री मध्य रेल्वे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. त्यानुसार, कल्याण येथून 1:30 वाजता सुटणारी लोकल पहाटे 3:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल.
हार्बर लाइन
- 31/12/24 – 1/1/25 च्या मध्यरात्री मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1:30 वाजता सुटणारी लोकल पहाटे 2:50 वाजता पनवेल येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल.
- 31/12/24 – 1/1/25 च्या मध्यरात्री मध्य रेल्वे पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. त्यानुसार, पनवेल येथून 1:30 वाजता सुटणारी लोकल पहाटे 2:50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल.
हेही वाचा – Airtel Down : एअरटेलचे नेटवर्क कोलमडले, ब्रॉडबँड ते मोबाइल सर्वच ठप्प