घरमुंबईमानापमान नाट्यानंतर एसी लोकल धावली

मानापमान नाट्यानंतर एसी लोकल धावली

Subscribe

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मागितली माफी

मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते गुरूवारी सीएसएमटी येथील एका कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवित रवाना करण्यात आले. मात्र या उद्घाटन सोहळ्याच्या मंचावर रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे मध्य रेल्वेचा पहिल्या एसी लोकलचा खोळंबा झाला. रेल्वेचा कार्यक्रम पत्रिकेत मुंबईच्या महापौरांसह इतर लोकप्रतिनिधींचा साधा उल्लेखही नसल्याबद्दल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी कार्यक्रमास्थळी जाहीर माफी मागावी लागली.

मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकलच सहित अनेक प्रवासी सुविधांचा उद्घाटन सोहळ्याचे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचा प्लॉटफॉर्म क्रंमाक 18 वर आयोजित करण्यात आला होता. मध्य रेल्वेची पहिल्या वातानुकूलित लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवित रवाना करण्यात आले. त्यानंतर इतर प्रवासी सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, मनोज कोटक, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

यादरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात रेल्वेच्या कार्यक्रम पत्रिकेवर आणि आसनांसमोरच्या डायसवर देखील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव नसल्याचे लक्षात आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ही वातानुकूलित लोकल जेथून सुटते आहे, त्या रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे नावही मंचावर नाही. रेल्वे अधिकारी वारंवार लोकप्रतिनिधींचा अपमान करीत प्रोटोकॉल पाळत नाही. अशा अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी विनंती सांवत यांनी केली आहे.

रेल्वे राज्यमंत्र्यांनी मागितली माफी
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या भाषणात खासदार अरविंद सावंत यांची जाहीर माफी मागितली. तसेच यापुढे कोणत्याही कार्यक्रमात जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून नियोजन करण्याचे आदेशही सुरेश अंगडी यांनी दिले आहेत. यावेळी अंगडी म्हणाले की, पुढील 10 वर्षांत प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासन तब्बल 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. रेल्वे यंत्रणेतील उणीवा दूर करण्यासाठी सर्वपक्षियांनी एकत्रितपणे काम करण्यास मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

पहिल्याच दिवशी लोकला लेट मार्क
मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल पहिल्याच दिवशी 17 मिनिटे उशिराने रवाना झाली. ट्रान्स हार्बरवरील पनवेल स्थानकातून दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवायचा होता.परंतु रेल्वे राज्यमंत्र्यांना बेळगावहून येण्यास उशीर झाल्याने ही गाडी उशीरा म्हणजे 3.47 वाजता रवाना करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -