घरमुंबईमध्य रेल्वेकडून तिमाहीत ३ हजार कोटींची माल वाहतूक

मध्य रेल्वेकडून तिमाहीत ३ हजार कोटींची माल वाहतूक

Subscribe

 २८.५८ टक्क्यांनी झाली वाढ

2019-20 वर्षातील पहिल्या तिमाहीत मध्य रेल्वेने 3 हजार 173 कोटी रुपयांची मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेते ही वाहतूक तुलनेत 4.4 टक्के अधिक होता. यातून 16.20 दशलक्ष टन माल वाहतूक करण्यात आली. यामुळे 28.58टक्के इतकी वाढ झाली, तर भंगार माल विक्रीतून 34.11 कोटी महसूल रेल्वेने मिळवला, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक ए.के. गुप्ता यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमात ते मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात बोलत होते. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये दीर्घकालीन सुधारणेतील रेल्वेच्या सततचा सहभाग कायम राखला आहे. रेल्वेमंत्र्यांनी नुकतेच परळ टर्मीनसचे उद्घाटन करुन खूप दिवसांपासून प्रलंबित असलेली प्रवाशांची मागणी पूर्ण केली. तसेच चितोडा-सोनेगाव विभागातील तिसरी मार्गीका, नारायणडोह-सोलापुरवाडी दरम्यान नवीन मार्गीका, भादली -भुसावळ विभागात तिसरी मार्गीका व शेनोली-भवानीनगर-ताकारी विभागातील दुहेरीकरण कार्यान्वित केले. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सुविधा झाली, असे ही गुप्ता म्हणाले. मागच्या महिन्यात तीन दिवसांत मुंबईत यावर्षी सर्वाधिक पाऊस पडला. मात्र पश्चिम रेल्वेने या वर्षी केलेल्या तयारीमुळे या अतिवृष्टीवर मात करण शक्य झाले. यंदा पावसाचा अंदाज घेऊन मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरु आहे, असेही गुप्ता म्हणाले.

- Advertisement -

उत्कृष्ट कार्यासाठी दक्षता पदक देऊन गौरव
भुसावळच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केद्रांचे उप निरीक्षक रामनारायण यादव यांना पोलीस पदकाने सम्मानित करण्यात आले. तसेच पश्चिम रेल्वेचे वडोदराच्या मेमू कारशेडचे वरिष्ठ अभियंता रुपनारायण सिंह आणि मुंबई सेंट्रल विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता अजय ईसमपल्ली यांना रेल्वेमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी दक्षता पदक, रोख रक्कम आणि प्रशस्तीत पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -