घरमुंबईसीईटी प्रवेश परीक्षांचे भवितव्य संकटात!

सीईटी प्रवेश परीक्षांचे भवितव्य संकटात!

Subscribe

अर्ज न करता आलेल्या विद्यार्थ्याना संधी देण्याची युवासेनेची मागणी

लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढल्याने आता सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तब्बल १४ सीईटी परीक्षांचे भवितव्य अवघड झाले आहे. या परीक्षांचे नियोजन कसे करायचे हाच प्रश्न आता सीईटी सेलला पडला आहे. एमएचटी सीईटीचे अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र अजूनही काही विद्यार्थी शिल्लक आहेत. त्या विद्यार्थ्यांना या काळात संधी द्या, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे सीईटी सेलचा निर्णय

राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येणारी एमएचटी सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तब्बल ९ दिवस १८ शिप्ट मध्ये ही परीक्षा १३ एप्रिलपासून होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे सीईटी सेलने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

दरवर्षी पेक्षा यंदा या परीक्षेला १ लाख ११ हजार ६१३ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. तर राज्याबाहेरचे विद्यार्थी १६ हजार ९६२ नोंदणी केली आहे. विविध कारणांमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. सध्या सीईटी पुढे ढकलल्याने ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी मिळावी, या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदत वाढ द्यावी, अशी मागणी युवासेनेचे सिनेट सदस्य अॅड वैभव थोरात, प्रदीप सावंत, सुप्रिया करंडे, प्रवीण पाटकर, धनराज कोहचाडे यांनी केली आहे.


अभियांत्रिकी महाविद्यालयात फी सक्ती नको; एआयसीटीईचे आदेश
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -