घरमुंबईमुक्काम हॉटेलात, काम ट्रेनमध्ये चोरी

मुक्काम हॉटेलात, काम ट्रेनमध्ये चोरी

Subscribe

कोकणात जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांमध्ये चैन स्नॅचिंग करून मुंबईत लॉजवर राहणाऱ्या चोरांना अटक करण्यात आली आहे. चोरी करुन हे चोर ज्या लॉजमध्ये राहायचे, त्याचे दिवसाचे भाडे एक हजार रुपये होते. नवाबी थाटात राहणाऱ्या या चोरांच्या लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आश्चर्य म्हणजे गेली काही वर्षे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर चोऱ्या करून त्यांनी बक्कळ पैसा मिळवला. हा पैसा त्यांनी त्यांच्या गावी रिक्षा आणि प्रवासी वाहने विकत घेऊन पद्धतशीरपणे ‘गुंतवला’ होता.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांमध्ये पहाटेच्या वेळेस कोपर आणि पनवेल स्थानकांवर चैन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार ६ जून रोजी मुंबईच्या ग्रँट रोड येथून हर्षा लॉजमधून चक्कनलाल सोनकर, वय ४० वर्षे या आरोपीस पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीने १९ गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे.

- Advertisement -

ट्रेनमध्ये सोनसाखळी चोरल्यानंतर आरोपी चक्कनलाल हा झवेरी बाजारातील दलाल विंकल गिरीश शहा याच्यामार्फत सोने विकायचा. पोलिसांनी दलाल विंकल शहा याला सुद्धा अटक केली असून त्यांच्यामार्फत विकलेले ५ लाख ८५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात आणखीन एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -