घरताज्या घडामोडीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपासिंह थापाही शिंदे गटात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपासिंह थापाही शिंदे गटात

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपासिंह थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिंह थापा हे बाळेसाहेब ठाकरे यांचे सेवक होते. प्रत्येक कार्यक्रमास्थळी चंपासिंह थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखीसोबत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू चंपासिंह थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिंह थापा हे बाळेसाहेब ठाकरे यांचे सेवक होते. प्रत्येक कार्यक्रमास्थळी चंपासिंह थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखीसोबत होते. मात्र आता चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. (Champasingh Thapa join CM Eknath Shinde group in thane )

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक असलेले चंपासिंह थापा यांचे मातोश्री निवासस्थानाशी फार जवळचे नाते होते. सोमवारी चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

चंपासिंह थापा यांना दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिले. त्यांना पाणी देणे, नॅपकिन देणे, चालताना हात धरून आधार देणे ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.

नवरात्रीच्या निमित्ताने थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे साहेबांना भेटलो. पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचे थापा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी थापा यांचे स्वागत केले आहे. थापा यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच जे काही सुरू होते ते योग्य नसल्याने त्यांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


हेही वाचा – अकोलातील अगस्ती साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा; भाजपाचा पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -