घरमुंबई'मी पुन्हा येईन', पावसाचं मुंबईत जोरदार कमबँक!

‘मी पुन्हा येईन’, पावसाचं मुंबईत जोरदार कमबँक!

Subscribe

मुंबईसह कोकण आणि लगतच्या परिसरात येत्या २४ तासात पाऊस बरसण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.

मुंबई आणि लगतच्या परिसरात आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर मुंबईच्या काही भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान गोवा, कर्नाटक लगत समुद्रामध्ये ‘महा’ वादळामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे हे वादळ सरकत आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि लगतच्या परिसरात येत्या २४ तासात पाऊस बरसण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.

- Advertisement -

Chance of rain in Mumbai in next 24 hours! 1

पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली

आज दुपारी दक्षिण मुंबई भागात पावसाने अचानक हजेरी लावली. तर वांद्र्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर ठाणे परिसरातही आज ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपार नंतर भांडुप, मुलुंड परिसरासह ठाण्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यंदा दिवाळी होऊनही पाऊस बरसत असल्याने नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, नाशिक, डहाणू आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

Chance of rain in Mumbai in next 24 hours! 2

समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा

दरम्यान गोवा, कर्नाटक लगत समुद्रामध्ये ‘महा’ वादळामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘महा’ हे वादळ ४० ते ६० किलोमीटरच्या गतीनं उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर ८ ते १२ फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी सावध राहण्याची सूचना स्कायमेटनं दिली आहे.

Chance of rain in Mumbai in next 24 hours! 3

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -