चंदा कोचर म्हणतात, अटक बेकायदा; न्यायालयाने मागवला खुलासा

न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. पी.के. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर कोचर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. कोचर दाम्पत्य सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. ते आता जामीनासाठी अर्ज करु शकतात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. वरीष्ठ वकील अमित देसाई व विक्रम चौधरी यांनी कोचर यांच्यावतीने युक्तिवाद केला. पुढच्या आठवड्यात कोचर यांच्या मुलाचा विवाह आहे. मात्र त्यांंनी जामीनासाठी अर्ज केलेला नाही, असे कोचर यांच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले.

cbi arrests former icici md and ceo chanda kochar and her husband deepak kochar in videocon loan case

मुंबईः आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांनी सीबीआयने केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा केला आहे. या अटकेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेचे प्रत्यूत्तर सादर करण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.

न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. पी.के. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर कोचर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. कोचर दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते आता जामीनासाठी अर्ज करु शकतात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. वरीष्ठ वकील अमित देसाई व विक्रम चौधरी यांनी कोचर यांच्यावतीने युक्तिवाद केला. पुढच्या आठवड्यात कोचर यांच्या मुलाचा विवाह आहे. मात्र त्यांंनी जामीनासाठी अर्ज केलेला नाही, असे कोचर यांच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले.

कोचर यांच्याविरोधात चार वर्षांपूर्वी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे. फौजदारी दंड संहिता ४१ अ कलमाचा याने भंग झाला आहे. मात्र चंदा कोचर यांच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे ईडीने(सक्तवसुली संचालनालय) न्यायालयाला सांगितले. त्यावर कोचर यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

त्याचवेळी कोचर यांच्या याचिकेचे प्रत्यूत्तर सादर करण्यासाठी सीबीआयचे वकील राजा ठाकरे यांनी वेळ मागितला. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. यावरील पुढील सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे.

आयसीआयसीआय बँकेने सन २००९ ते २०११ या कालावधीत व्हिडीओकॉन समूहाला सुमारे १८७५ कोटी रुपायंचे कर्ज दिले होते. हे कर्ज देताना गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. सुरुवातीला बँकेने कोचर यांची बाजू घेतली. सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर बँकेने आपली भूमिका बदलली. या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी जून २०१८ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली.

या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचे सीओई पद सोडावे लागले. नियमाबाह्य कर्ज दिल्यामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या प्रकरणी सीबीआयने २२ जानेवारी २०१९ रोजी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या महिन्यात चंदा कोचर यांना सीबीआयने अटक केली.