घरमुंबईनाईट लाईफ, मोर्चे चालतात मग शिवजयंतीवर निर्बंध का?, चंद्रकांत पाटलांची सडकून टीका

नाईट लाईफ, मोर्चे चालतात मग शिवजयंतीवर निर्बंध का?, चंद्रकांत पाटलांची सडकून टीका

Subscribe

अधिवेशन आलं की सरकार पळ काढते - चंद्रकांत पाटील

राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या शिवजयंतीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढच असल्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यासाठी गर्दी करु नये १०० लोकांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करावी असे राज्य सरकारद्वारे सांगण्यात आले होते. राज्य सरकारच्या या निर्बंधांवर विरोधी पक्षाचे नेते व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राज्य सरकारला नाईट लाईफ, आझाद मैदान ते राजभवन चालतो, राजकीय सभा, संमेलने चालतात परंतु शिवजयंती आल्यावर कोरोनामुळे निर्बंध घालण्यात आलेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील छत्रपती शिवाजी माहाराजांना अभिवादन केल्यानंतर बोलत होते.

कोरोनाचे वाढते प्रमाण याची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे यामध्ये काही शंका नाही. परंतु राज्य सरकारला नाईटलाईफ चालते, आझाद मैदान ते राजभवन मोर्चा चालतो. एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गावोगावी फिरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत त्यामुळे काळजी घेऊन सगळ्यांना कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे.

- Advertisement -

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकी वसुलीनंतर १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करु असे म्हटले होते. तर त्यांच्याच पक्षातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सत्ते आल्यावर वीज बील माफ करु असे वक्तव्य केले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मागील २०-२२ वर्षे काँग्रेस अशाप्रकारची घोषणा करत असते. निवडणुकींपरते लोकांना मतांसाठी आकर्षित करण्यासाठी काँग्रेस नेहमी असे म्हणत असते. एवढाच त्याचा हेतु असतो परंतु आताही सत्ते आहात तर आता करा असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -