Diva-Sawantwadi Trains : दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेत बदल

Demu special service resumes between Manmad and Huzur Sahib Nanded
मनमाड आणि हुजूर साहिब नांदेड दरम्यान डेमू  विशेष सेवा पूर्ववत

मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक ०१०१५ दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेसच्या दिवा येथून सुटण्याच्या वेळा २५ नोव्हेंबर २०२१ पासून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २५ नोव्हेंबर २०२१ पासून दिवा येथून ०६.५५ च्या विद्यमान सुटण्याच्या वेळेऐवजी दिवा येथून ०६.२५ वाजता सुटेल.

१०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या सुधारित आगमन/निर्गमनाच्या वेळा २५ नोव्हेंबरपासून खालीलप्रमाणे असतील –

कळंबोली येथे ०६.३९/०६.४० वाजता (०७.१८/०७.१९ वाजता), पनवेल ०७.२०/०७२५ वाजता (०७.२८/०७.३० वाजता), आपटा ०७.४४/०७.४५ वाजता (०७.४९/०७.५० वाजता), जिते ०७.५४/०७.५५ वाजता (०७.५९/०८.०० वाजता). ब्रॅकेटमध्ये दर्शविलेल्या वेळा विद्यमान आगमन/निर्गमन वेळा आहेत.

थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.


हे ही वाचा – ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, १० तारखेपर्यंत होणार पगार, अनिल परबांची घोषणा