घरताज्या घडामोडीमहापौर आक्षेपार्ह विधान प्रकरणात २ दिवसात दोषारोपपत्र दाखल करणार, गृह विभागाचे स्पष्टीकरण 

महापौर आक्षेपार्ह विधान प्रकरणात २ दिवसात दोषारोपपत्र दाखल करणार, गृह विभागाचे स्पष्टीकरण 

Subscribe
मुंबईच्या महापौरांवर आक्षेपार्ह विधान केल्याबाबत तसेच महिलांचा अपमान केल्याबाबतचा लक्षवेधी सूचनेवर विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे यांनी आज सभागृहात मांडला. या विषयावर झालेल्या चर्चेनंतर गृह विभागाची बाजू मांडताना सतेज पाटील यांनी दोन दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल असे आश्वासन सरकारच्या वतीने दिले. याआधी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी बीडीडी चाळ, वरळीत झालेल्या सिलेंडर स्फोटानंतर महापौर घटनास्थळी वेळीच पोहचू न शकल्याने महापौरांवर आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले होते.
आज झालेल्या चर्चत ससत्ताधारी आणि विरोधी पक्षात खडाजंगी झाली. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज काही काळ स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरवात झाली. या प्रकरणात समस्त महिला वर्गाचा अपमान झाला असल्याचा मुद्दा मनिषा कायंदे यांनी मांडला. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे. तसेच महिला आयोगानेही या प्रकरणातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठविण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले होते. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणात थेट कोणाचेही नाव सभागृहात घेण्याचे टाळण्यात आले.
भाजप आमदार यांनी महापौरांच्या वक्तव्यावर खुलासा करत आपण सरकार म्हणून टीका केल्याचा खुलासा केला होता. तसेच मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर महापौरांना अत्यंत हीन भाषेत घराच्या पत्त्यावर विजय म्हात्रे या व्यक्तीने पत्र ९ डिसेंबर रोजी पाठवले होते. या पत्रात धमकीचा वापर करण्यात आला होता.


हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2021: मुंबई उपनगरासाठी आर. आर बोर्डाची स्थापना करणार – जितेंद्र आव्हाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -