Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग मुंबईकर विद्यार्थ्यांनो परीक्षांवर बहिष्कार टाका - छात्रभारती

मुंबईकर विद्यार्थ्यांनो परीक्षांवर बहिष्कार टाका – छात्रभारती

कोरोनावर लस निघत नाही व मुंबई ग्रीन झोन घोषित होत नाही तोपर्यंत सर्व परीक्षांवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी केले आहे.

Related Story

- Advertisement -

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत यूजीसीचा निर्णय हा निंदनीय आहे. विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. भाजप व संलग्न संघटनांकडून करण्यात येत असलेल्या गलिच्छ राजकारणाविरोधात विद्यार्थ्यांनी असहकार आंदोलन सुरु केले पाहिजे. कोरोनावर लस निघत नाही व मुंबई ग्रीन झोन घोषित होत नाही तोपर्यंत सर्व परीक्षांवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी केले आहे.

यूजीसी विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत आहे. वारंवार बदलती भूमिका विद्यार्थ्यांना छळणारी आहे. भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. बिगर भाजप शासित राज्यसरकारने परीक्षा रद्द केल्याने जाणीवपूर्वक भाजपकडून हा निर्णय घेतल्याचा आरोप रोहित ढाले याने केला. अंतिम वर्षाच्या परीक्षा जर एवढ्या महत्वाच्या असतात मग अनेक वर्षांपासून सहा सेमिस्टरचे मूल्यमापन करुन निकाल का लावण्यात येत आह. मुलांनी पाच सेमिस्टरपर्यंत परीक्षा दिल्या आहेत. त्याचे मूल्यमापन करुन सहज निकाल लावता येऊ शकतो, पण विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम यूजीसी करत आहे. याआधी परीक्षा न घेता मूल्यांकन कसे करता येईल हे मार्गदर्शक सुचीमध्ये यूजीसीने स्पष्ट केले असताना पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना का त्रास दिला जात आहे, असा सवाल ढाले यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत करोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ठिकठिकाणी शाळा,कॉलेज विलगीकरणासाठी वापरले आहेत. अनेक ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे. हे असताना अभ्यास न करता युजीसी पोरखेळ करत असल्याचा आरोप रोहित ढालेंनी केला आहे.

- Advertisement -