घरमुंबईफ्लॅटचे आमिष दाखवून ३८ लाख रुपयांची फसवणूक

फ्लॅटचे आमिष दाखवून ३८ लाख रुपयांची फसवणूक

Subscribe

फ्लॅटचे आमिष दाखवून एका व्यापार्‍याला सुमारे 38 लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या नीरज मनसुखलाल वेद या बांधकाम व्यावसायिकाला रविवारी भांडुप पोलिसांनी अटक केली.

फ्लॅटचे आमिष दाखवून एका व्यापार्‍याला सुमारे 38 लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या नीरज मनसुखलाल वेद या बांधकाम व्यावसायिकाला रविवारी भांडुप पोलिसांनी अटक केली. सोमवारी स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्याविरोधात लवकरच कारवाईची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नेहा ऋषभ शहा आणि निलेश जयंतीलाल पारेख अशी या दोघांची नावे आहेत.

विपीन मेघजी देढिया हे त्यांच्या कुटुंबियांसोबत भांडुप येथील एलबीएस मार्गावरील जैन मंदिरासमोरील युनिव्हर्स इमारतीच्या फ्लॅट क्रमांक सी-1901 मध्ये राहतात. त्यांची गणेश इन्फ्रास्टक्चर नावाची एक कंपनी असून ही कंपनी बांधकाम व्यवसायासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे काम करते. सात वर्षांपूर्वी त्यांची कंत्राटदार भरतभाईंशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांच्याशी बांधकाम साईटवर लागणार्‍या साहित्यांची मागणी करुन त्यांना कमी दरात ते साहित्य देण्याची विनंती केली होती. त्यांच्या ओळखीतून विपीन देढिया यांची मेसर्स श्रीनाथ बिल्ड ग्रँड लिमिटेड या बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीचे तीन मालक नीरज वेद, नेहा शहा आणि निलेश पारेख यांच्याशी ओळख झाली होती. या तिघांनी आपले भांडुप येथील विहार लेक रोड, भांडुप गावात श्रीनाथ दर्शन या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे सांगितले होते. त्या इमारतीमध्ये देढिया यांना कमी किमतीत फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले.

- Advertisement -

विपीन देढिया यांना घराची आवश्यकता असल्याने त्यांनी त्यांच्या निर्माणधीन इमारतीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. या इमारतीमध्ये त्यांना नवव्या मजल्यावर 6200 प्रती चौरस फुटाचा फ्लॅट देण्याचे मान्य करुन त्यांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपये टोकन घेतले होते. त्यानंतर त्यांच्याकडून 9 मार्च 2012 ते 13 जानेवारी 2013 या कालावधीत चेकद्वारे 33 लाख रुपये असे एकूण 38 लाख रुपये घेतले होते. दोन वर्षांत त्यांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले, मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही, तसेच फ्लॅटसाठी दिलेले पैसेही परत केले नाही.

या पैशांची इतर ठिकाणी गुंतवणूक करुन त्यांनी त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भांडुप पोलिसांत या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच रविवारी नीरज वेद याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते सध्या पोलीस कोठडीत त्यांचे इतर दोन भागीदारांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -