घरमुंबईभुजबळांच्या उपस्थितीमुळे सेनेची दहीहंडी चर्चेत

भुजबळांच्या उपस्थितीमुळे सेनेची दहीहंडी चर्चेत

Subscribe

मुंबईत आणि उपनगरात सोमवारी पुन्हा एकदा थरांचा थरथराट पहायला मिळाला. पण मुंबईकरांचे लक्ष वेधले ते भायखळा परिसरातील दहीहंडीने. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चक्क शिवसेनेतर्फे आयोजित दहीहंडीत हजेरी लावली.

मुंबईत आणि उपनगरात सोमवारी पुन्हा एकदा थरांचा थरथराट पहायला मिळाला. पण मुंबईकरांचे लक्ष वेधले ते भायखळा परिसरातील दहीहंडीने. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चक्क शिवसेनेतर्फे आयोजित दहीहंडीत हजेरी लावली. भुजबळांच्या या हजेरीने पुन्हा एकदा राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या असून उलटसुलट चर्चेला उधाण आले. दरम्यान, या भेटी दरम्यान भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे देखील उपस्थित होते. भुजबळ येथील राष्ट्रवादीच्या दहीहंडीसाठी आले होते. त्यानंतर त्यांनी शेजारीच असलेल्या शिवसैनिकांच्या दहीहंडीला हजेरी लावत गोविंदा पथकांचे मनोबल उंचविले.

भायखळा परिसरातील फेरबंदर परिसरात विविध राजकीय पक्षांनी दहीहींडीचे आयोजन केले होते. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांची देखील दहीहंडी होती. तर याठिकाणी शिवसेनेचे अ‍ॅड. मंगेश बनसोड यांनीही दहीहंडीचे आयोजन केले होते. या हंडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधल्याचे दिसून आले. या दहीहंडी सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले. या भेटीत त्यांनी यावेळी उपस्थित गोविंदा पथकांचे अभिनंदन देखील करीत त्यांना पारितोषिक देखील दिले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ देखील उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील यावेळी हजर होते. ज्यात प्रामुख्याने शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे आणि इतरांचा समावेश होता. भुजबळांच्या या हजेरीमुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

या अगोदरही भुजबळांनी अनेकवेळा शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी लावलेल्या या हजेरीमुळे राजकीय विश्लेषकांच्या नजरा उंचविल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भुजबळांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर एका लग्नासमारंभात भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने देखील राजकीय चर्चेला उधाण आले होते.  दरम्यान, अ‍ॅड. मंगेश बनसोड हे खंदे भुजबळ समर्थक मानले जातात. त्यांनी या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वीच बनसोड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. तर बनसोड यांनी भुजबळांच्या महात्मा फुले प्रतिष्ठानाचे देखील काम पाहिले आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी भुजबळ केईएम रुग्णालयात दाखल असताना देखील बनसोड यांनी याठिकाणी हजेरी लावली होती. त्यामुळे भुजबळांनी सोमवारी या गोविंदा सोहळ्यात हजेरी लावली असल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -