घरदेश-विदेशChhota Rajan : छोटा राजनची 26 वर्ष जुन्या हायप्रोफाईल प्रकरणातून निर्दोष सुटका;...

Chhota Rajan : छोटा राजनची 26 वर्ष जुन्या हायप्रोफाईल प्रकरणातून निर्दोष सुटका; काय होते आरोप?

Subscribe

Chhota Rajan : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने शुक्रवारी राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ ​​छोटा राजनची (Chhota Rajan) 26 वर्ष जुन्या हायप्रोफाईल प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील कामगार संघटनेचे नेते डॉ. दत्ता सामंत (Dr. Datta Samant) यांची 1997 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी (Case Of Murder) छोटा राजनवर मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, विशेष सीबीआय न्यायाधीश ए.एम. पाटील (A.M. Patil) यांनी पुराव्याअभावी छोटा राजनची हत्येसंदर्भातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. (Chhota Rajan Chhota Rajan acquitted in 26 year old high profile case What was the charge)

हेही वाचा – NCRB Report 2021 : महिला-मुली बेपत्ता होण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

- Advertisement -

डॉ. दत्ता सामंत यांची 16 जानेवारी 1997 रोजी मुंबईतील पद्मावती रोडवर चार जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. डॉ. दत्ता सामंत त्यांच्या जीपमधून पवईहून घाटकोपरला जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी डॉ. सामंत यांची जीप अडवून त्यांच्यावर 17 गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. गोळी सामंत यांच्या चेहऱ्यावर आणि मानेला लागली होती. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर डॉ. सामंत यांचा चालक भीमराव सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काही स्थानिक लोकांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीवरून जुलै 2000 मध्ये निकाल देण्यात आला. मात्र यावेळी गुरु साटम आणि राजनचा विश्वासू लेफ्टनंट रोहित वर्मा हे फरार असल्याचे दाखवण्यात आले आणि खटला बाजूला ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Mango : एका किलो आंब्याची किंमत तब्बल 3 लाख रुपये; भारतातही सुरू झाली लागवड

छोटा राजनला बाली येथून पकडले

डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या छोटा राजनला ऑक्टोबर 2015 मध्ये बाली, इंडोनेशिया येथून अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने छोटा राजनवर नोंदवल्यात आलेले सर्व गुन्हे आणि डॉ. सामंत यांच्या हत्येप्रकरणी  खटला चालवला. मात्र पुराव्याअभावी विशेष सीबीआय न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी छोटा राजनची निर्दोष सुटका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -