घरमुंबईमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

Subscribe

फोन टॅपींग प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार

राज्यात सुरु असलेल्या फोन टॅपींग प्रकरणावर वेगवाना घडामोडी घडताना दिसत आहेत. फोन टॅपींग प्रकरणात आणि गृहमंत्र्यांवर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल चर्चा आणि माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्यातील काही मंत्र्यांचे रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केले होते. यावर भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन बंद लिफाफ्यात पुराव्यांसहित कागदपत्रे दिले आहेत. तसेच त्यावर तात्काल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील सर्व मंत्र्यांनी फोन टॅपींग प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली.

राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पाचारण केले होते. यावेळी पुन्हा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत फोन टॅपींग प्रकरणात सखोल चर्चा करण्यात आली. तसेच फोन टॅपींग प्रकरण आणि गृहमंत्र्यांवरील आरोपांबद्दल माहिती देण्यासाठी आणि काय आरोप केले आहेत. त्याची वस्तूस्थिती काय आहे ते सांगण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

वर्षा निवासस्थानी जो निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत सरकार गुरुवारी २५ मार्चला प्रेस नोट जारी करुन सविस्तर माहिती देण्यात येऊल, तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार असल्याचीही माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -