घरमुंबई'कचरामुक्‍त मुंबई अभियान'चे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

‘कचरामुक्‍त मुंबई अभियान’चे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने जुलै महिन्यात अस्वच्छता करणाऱ्या १९ हजार ७५२ व्यक्तींवर कारवाई करुन ५० लाख ७९ हजार १०० रुपये एवढा दंड वसुल केला आहे.

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे संयुक्त ‘कचरामुक्त मुंबई अभियान’ राबविण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता रहावी या उद्देशाने नागरिकांमध्ये जागृता व्हावी यासाठी महापालिका नियमितपणे सातत्यापूर्ण प्रयत्न करीत आहे. यासाठी प्रयत्नांची परिणामकारकत वाढवावी म्हणून ‘कचरामुक्त मुंबई अभियान’ राबवण्यात येणार आहे. हे अभियान दर महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सहित किमान १० दिवस होणार आहे. लोकसहभागातून आणि मुंबई पोलीसांच्या सहकार्याने या अभियानाचे उद्धाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दि. २९ जुलै २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबई पोलीस मुख्यालयात संपन्न होणार आहे.

१९ हजार ७५२ व्यक्तींवर केली कारवाई

या दरम्यान कचरा मुक्त मुंबईच्या दिशेने सातत्याने प्रयत्नरत असणाऱ्या मुंबई महापालिकेने १ ते २३ जुलै २०१९ दरम्यान अस्वच्छता करणाऱ्या १९ हजार ७५२ व्यक्तींवर कारवाई करुन ५० लाख ७९ हजार १०० रुपये एवढा दंड वसुल केला आहे, अशी माहिती महापालिकेचे सह आयुक्त अशोक खैरे यांनी दिली आहे. कचरामुक्‍त मुंबई अभियान २०१९ राबविण्याकरिता करण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजना आणि संबंधित बाबी यांची मुद्दे निहाय माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.

- Advertisement -
२४ फिरत्‍या उपद्रव शोधपथक पथकांची स्‍थापना

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्‍यक्‍तीवर कार्यवाही करण्‍यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्‍ये क्‍लीनअप मार्शल एजन्‍सींची नेमूणक करण्यात आली आहे. तसेच या कचऱ्या टाकणाऱ्या व्‍यक्‍तींवर कार्यवाहीसाठी मुंबई महापालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागांमध्‍ये प्रत्येकी एक पथकाची यानुसार एकूण २४ फिरत्‍या उपद्रव शोधपथक पथकांची स्‍थापना करण्यात आली. त्यांच्याद्वारे कारवाई आणि दंड वसुली करण्यात येत आहे. या पथकांमध्ये कामगार आणि कर्मचाऱ्यांसह विविध खात्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नाल्‍यांलगतच्‍या झोपड्पट्टी परिसरातून नाल्‍यांमध्‍ये कचरा पडू नये म्‍हणून क्‍लीन अप मार्शल तसेच उपद्रव शोधकांची नेमणूक करण्यात आली आहे. जून २०१९ पासून नाल्‍यांमध्‍ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. यानुसार १ ते २३ जुलै २०१९ या २३ दिवसांच्या कालावधीदरम्यान सुमारे ५ हजार ४०० व्‍यक्‍तींवर कारवाई करुन ९ लाख ८८ हजार ७०० रुपयांचा इतका दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच जास्‍त वर्दळींच्या ठिकाणी परिसर अस्‍वच्‍छ करणाऱ्या व्‍यक्‍तींवर देखील उपद्रव शोध पथकांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत १४ हजार ३७६ व्यक्तींवर कारवाई करुन ३९ लाख ७७ हजार ४०० इतका दंड वसुल करण्‍यात आला आहे.

शून्‍य कचरा उद्दीष्‍ट्ये साध्य करण्यासाठी…

वरील तपशिलानुसार १ ते २३ जुलै २०१९ या २३ दिवसांच्या कालावधी दरम्यान परिसर अस्वच्छ करणाऱ्या एकूण १९ हजार ७५२ व्‍यक्‍तींवर कार्यवाही करुन ५० लाख ७९ हजार १०० रुपये इतका दंड वसूल करण्‍यात आला आहे. सार्वजनिक वर्दळींच्या ठिकाणी अनधिकृत पणे कचरा टाकणारे अ‍थवा परिसर अस्‍वच्‍छ करणारे यांच्‍यावर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस यांच्‍या मार्फत मुंबईतील सर्व पोलीस ठाणे म्हणजेच ९३ पोलीस ठाणांच्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये संयुक्‍त मोहीम सुरु करण्यात येत आहे. प्रत्‍येक पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतीमध्‍ये स्‍वच्‍छता आणि कचरा वर्गीकरण यासाठी विशेष मोहीम राबवून शून्‍य कचरा उद्दीष्‍ट्ये साध्य करण्यासाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी संयुक्तपणे आणि लोकसहभागातून केली जाणार आहे.

- Advertisement -
सी सी टीव्‍ही कॅमेऱ्यांच्या उपयोग करणार 

मुंबई मनपा आणि मुंबई पोलीस यांच्‍यावतीने प्रत्‍येक पोलीस ठाण्‍याच्‍या नाल्‍यांशेजारील अथवा पाणथळ सभोवताल असणाऱ्या परिसरातील एक वस्‍ती स्‍वच्छता किंवा प्रबोधनासाठी दरमहा दत्‍तक घेणार आहेत. जेणेकरुन नाल्‍यात पडणाऱ्या कचऱ्यास प्रतिबंध केला जाईल. पोलीस ठाणे हद्दीतील तसेच महापालिका विभाग कार्याक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी उघडयावर पडणारा कचरा बंद करण्‍यासाठी मनपा, पोलीस, नागरिक, युवक आणि लोकप्रतिनिधी यांच्‍या सहभागातून परिसर स्‍वच्‍छता आणि कचरा वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्‍याबाबत संयुक्त अभियान सुरु करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्‍वच्छता करणाऱ्यांवर मनपा आणि पोलीस कायदा अंतर्गत धडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्‍तावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत लक्ष ठेवण्‍यासाठी सी सी टीव्‍ही कॅमेऱ्यांच्या उपयोग करण्यात येईल. महानगर पालिका आणि मुंबई पोलीस यांच्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर दररोज सकाळी ७.०० ते १०.०० या कालावधीदरम्यान आपल्या कार्यक्षेत्रात पाहणी करतील. तर कामाची गणुवत्‍ता वाढवण्‍याच्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्‍तांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -