घरमुंबईमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा नवा पॅटर्न; जिथे शिवसेना तिथे 'कंटेनर शाखा'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा नवा पॅटर्न; जिथे शिवसेना तिथे ‘कंटेनर शाखा’

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हांवर ताबा मिळवला आहे. तर आता राज्यभरातील शिवसेनेच्या शाखाही शिवसेने (शिंदे गट) कडेच रहाव्यात म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुंब्र्यातील शाखेचा वाद पाहता एकनाथ शिंदेंनी एक नवा पॅटर्न अमलात आणला असून, तो म्हणजे जिथे शिवसेना तेथे आता कंटेनर शाखा उभारल्या जाणार आहेत. (Chief Minister Eknath Shindes New Pattern Where there is Shiv Sena there is container branch)

शिवसेनेत बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही काही महिन्यापूर्वीच ताबा मिळवला आहे. त्यानंतर शिंदे-ठाकरे एकमेंकांवर सातत्याने आरोप- प्रत्यारोप करताना दिसतात. अशातच काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरून झालेल्या वादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ठाकरेंना शह देण्यासाठी नवा पॅटर्न अमंलात आणल्या जात असून, तो म्हणजे शिवसेनेच्या शाखांचा वाद उफाळून येऊ नये म्हणून आता जिथे शिवसेना तिथे कंटेनर शाखा हा पायंडा अवलंबल्या जात आहे.

- Advertisement -

मुंब्र्यातील शाखेचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कंटेनर शाखा

मुंब्र्यातील शिवसेना शाखेचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहला असतानाच पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून आता सामंजस्याची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. अशातच मुंब्र्यात आता शिंदे गटाचे राजन किणे यांनी शाखेच्या पुनर्बांधणीचे काम होईपर्यंत कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला सुरू केली आहे.

हेही वाचा : “…तर जरुर गुन्हे दाखल करा”, मनोज जरांगेंचे सरकारला थेट आव्हान

- Advertisement -

पालिका प्रशासन चार हात लांब

मुंब्र्यातील शिवसेनेचा शाखा कोणत्या गटाची आहे हा वाद सुरू असतानाच शिंदे गटाचे राजन किणे यांनी कंटेनर शाखा सुरू केली आहे. यावेळी मात्र, या प्रकरणापासून पालिका प्रशासन चार हात लांबच राहत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे शिवाईनगर येथील मुख्य चौकात टीएमटी बस थांब्याशेजारीच शिंदे गटाने 9 नोव्हेंबर रोजी नवीन शाखेचे उद्घाटन केले. ही कंटेनर शाखा चक्क पदपथावरच आठ फूट रुंद व चौदा फूट लांब असून, यामुळे पादचाऱ्यांना या शाखेचा त्रास होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाने या विरोधात भूमिका मांडली आहे. तेव्हा पुन्हा एकदा कंटेर शाखेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : मास्तर, हे बरं नव्हं : निलंबनाच्या रागातून प्राध्यापकांचा मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर हल्ला

आवश्यक तिथे कंटेनर शाखा

मुंब्र्यातील कंटेनर शाखेनंतर आता भविष्यात ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी कंटेनर शाखा उपलब्धही करून दिल्या जातील. या शाखेचे कोणतेही पक्के बांधकाम केले जाणार नसून, आवश्यकतेनुसार ते इतर ठिकाणी स्थलांतरित करता येईल अशी माहिती शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -