घरमुंबईजानेवारी 2023 होणार मुंबई मॅरेथॉन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

जानेवारी 2023 होणार मुंबई मॅरेथॉन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Subscribe

जानेवारी 2023 मुंबई मॅरेथॉन होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन 2023 ची घोषणा केली आहे. मुंबई मॅरेथॉन ही प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचे हे 18 वे वर्ष आहे. ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 ला होणार आहे. या घोषणेवेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ही उपस्थित होते.

17 वर्षांपासून आयोजित होणार्या या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत देशातील अनेक खेळाडूनी सहभाग घेतला आहे. सर्धेच्या फिजिकल आणि व्हर्चुअल रेसेससाठी 19 ऑगस्ट 2022 पासून नोंदणी सुरू होणार आहे. मुंबई मॅरेथॉनसाठी नोंदणी 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7:00 वाजल्यापासून सुरु होणार आहे. यासाठी sattatamumbaimarathon procam.in वर नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी मुंबई मॅरेथॅानमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होत असतात. या स्पर्धेत बॅालिवूड कलाकारही आपली उपस्थिती दर्शवितात. त्यामुळे मुंबई मॅरेथॅानला एक वेगळे ग्लॅमर आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे ही मॅरेथॅान होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात ही मॅरेथॅान स्पर्धा पार पडेल. ‘हर दिल मुंबई’ अशी टॅग लाईनने ही मॅरेथाॅन स्पर्धा पार पडणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांची राजकीय टोलेबाजी –

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी ही केली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही धावतो आणि धावायला लावतो. पण आम्ही धावत असतो. दिवस रात्र धावतो म्हणून यशस्वी होतो. आम्ही जी शर्यत खेळत होतो. त्यात अनेकांना वाटले होते की, आम्ही अयशस्वी होऊ. मात्र, आम्ही जिंकलो. मी तर 30 वर्षांच्या मॅरेथॅाननंतर मुख्यमंत्री झालो आहे. आता आम्हाला हाफ मॅरेथॅानचे तिकिट मिळाले आहे. कारण अडीच वर्ष आहेत ना. पुढच्या वर्षी आम्ही फुल मॅरेथॅान जिंकू, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही पण एक मॅरेथॅान खेळून आलो आहोत. मुंबई व्हाया सूरत गुवाहाटी, अशी आमची शर्यत होती. पण परत आलो आणि जिंकून आलो. हे पण महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -