घरमुंबईभांडूप ड्रिम्स मॉल आग प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार - मुख्यमंत्री

भांडूप ड्रिम्स मॉल आग प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्र्यांकडून भांडूप आग दुर्घटनेची पाहणी

भांडूपमधील ड्रिम्स मॉलमध्ये आग लागली या आगीत मॉलमधील सनराईज रुग्णालयाला आग लागली होती. यामध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. घटना स्थळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे. या आग दुर्घटनेत दुर्लक्ष, दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल तसेच मृतांच्य कुटुंबीयांना ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील असून दिलगीरी व्यक्त करतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली यामुळे आरोग्य व्यवस्थेची कमतरता भासू नये यासाठी शक्य तिथे कोविड सेंटर सुरु करण्यास परवानगी देण्यात आले होते. कोविड-१९ साठी हे रुग्णालय तयार करण्यात आले होते. ड्रिम्स मॉलमध्ये रुग्णालय करण्याची परवानगी देण्यात आली होती ती परवानगी ३१ मार्चला संपणार होती असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, ड्रिम्स मॉलमध्ये रुग्णालयाच्या खालच्या दुकानाला आग लागली होती. ही आग धुमसत वर रुग्णालयाला आग लागली. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण होते तसेच इतर काही रुग्ण होते या रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत रुग्णालयाच्या आयसीयूमधील १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आग दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कमला मिलमध्ये लागलेल्या आगीत काही निष्पाप लोकांचा बळी गेला होता. यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयातील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयांची दिलगीरी व्यक्त करतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -