घरमुंबईमुख्यमंत्र्यांचा 'मार्मिक' टोला; 'जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते...

मुख्यमंत्र्यांचा ‘मार्मिक’ टोला; ‘जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत’!

Subscribe

मार्मिकच्या हिरक महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला असून त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मार्मिक या नियतकालिकास ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे शिवसैनिकांशी तसेच महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

मी पण नुकताच ६० वर्षांचा झालो व मार्मिकसोबतच वाढलो. मार्मिक शिवसेनेचा जन्मदाता असून ते ६० वर्षांचे होत असताना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचे समाधान आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीसोबतचे संबंध, सरकार पाडण्याबद्दल भाजपा नेत्यांकडून केली जाणारी विधाने याचे पडसाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात उमटले. एरवी आपण मेळाव्यात भेटतो तेव्हा सारे समोर असता. आज या ऑनलाईन मेळाव्यात सोबत आहात, पण दिसत नाहीत. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा –

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधानांनी दिले संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -