आमदार रमेश लटकेंच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

Chief Minister Uddhav Thackeray paid his last respects to MLA Ramesh Latke
Chief Minister Uddhav Thackeray paid his last respects to MLA Ramesh Latke

आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यांनी लटके कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि मंत्री अदित्य ठाकरे उपस्थित होते. आमदार रमेश लटके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवाव आज शासकीय इतमामात अंत्य संस्कार होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हटले आहे.

आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. 2014 मध्ये भाजप उमेदवार सुनील यादव यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.