घरताज्या घडामोडीकॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोन आणि रुग्णालय व्यवस्थापनाची कडक अंमलबजावणी करा

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोन आणि रुग्णालय व्यवस्थापनाची कडक अंमलबजावणी करा

Subscribe

मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या ठाणे महापालिकेला सूचना दिल्या. तसेच नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकेचा आढावा घेतला.

ठाण्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या कामाचा आढावा घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढवून त्याची कडक अंमलबजावणी आणि रुग्णालय व्यवस्थापन या गोष्टींवर लक्ष देण्याच्या सूचना मेहता यांनी केल्या. यावेळी मुख्य सचिवांनी नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकेचा आढावा घेतला. यावेळी नगर विकास विभाग(२)चे प्रधान सचिव महेश पाठक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

कोरोनाच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण महापालिकेकडून बैठकीत करण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी प्रभाग समितीनिहाय कोरोना अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेऊन सहाय्यक आयुक्तांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना मेहता यांनी सांगितले की, प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तींच्या किमान २० लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याची आवश्यकता आहे, तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. विशेष म्हणजे झोपडपट्टीमध्ये कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी क्वारंटाईन करू नका त्यांना महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच पाठविण्यात यावे. त्याच बरोबर कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढवून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मेहता यांनी केल्या. रुग्णालय व्यवस्थापन महत्वाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठवा जेणे करून गरजू लोकांना ऑक्सिजनचे बेडस उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान हे किचकट काम असून बारकाईने काम करण्याची गरज असल्याचे सांगून अजोय मेहता यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविणे याला प्राधान्य द्या असेही मेहता यांनी या बैठकीत सांगितले. आढावा बैठकीनंतर मुख्य सचिवांनी ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआरडीए आणि एमसीएचआयच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या १ हजार बेडस हॉस्पिटलची पाहणी करून त्याची प्रशंसा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -