घरमुंबईदिवाळीत किल्ल्यांच्या स्वरूपात संस्कृतीची आठवण

दिवाळीत किल्ल्यांच्या स्वरूपात संस्कृतीची आठवण

Subscribe

दिवाळीनिमित्त ठाणे जिल्हयात किल्ले बांधणीची बच्चे कंपनीची धूम आहे. ठाण्यात विविध ठिकाणी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी बच्चे कंपनीने मातीचे किल्ले बांधले.

दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ तर आलाच; पण त्यातही बच्चे कंपनीसाठी सर्वात आवडता विषय म्हणजे किल्ले बनविणे. आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. लहान मुलांमध्ये किल्ल्यांविषयी व इतिहासाविषयी माहिती व्हावी या हेतूने दिवाळीत ठाणे जिल्हयात मातीचे किल्ले बनविण्यासाठी बच्चेकंपनी सरसावतात. किल्ले बांधणीची स्पर्धा होत असल्याने बाळगोपाळ किल्ल्यांचा अभ्यास करूनच ते साकारत आहेत. दिवाळीत किल्ले बांधणीतून महाराष्ट्राचा मराठमोळय़ा इतिहास संस्कृतीची आठवण ताजी होते.

जोमात साजरी झाली दिवाळी 

दिवाळीच्या प्रत्येक वसाहतीत रांगोळी, कंदील व एक लहानसा का होईना किल्ला हा दिसतोच. मातीचा किल्ला बनविण्याची मजा काही औरच असते. मातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतूट नातं आपल्याकडे दिसून येतं. ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर आदी परिसरात किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन केलं जात या स्पर्धांना बच्चेकंपनीचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. दिवाळीच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासूनच बच्चे कंपनी किल्ला बनविण्यास सुरूवात करतात. माती, दगड व विटांनी किल्ल्यांची सुबक प्रतिकृती साकारली जाते. सोसायटीच्या आवारात तर इमारती व चाळीच्या अंगणात किल्ले साकारताना दिसतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाचे हे गड-किल्ले प्रतीक आहेत. त्यामुळे लहान मुलांना किल्ले बांधणीला थोरामोठांचेही प्रोत्साहन लाभते, परिसरातील संस्था मंडळांकडून किल्ले बांधणी स्पर्धाच आयोजन केलं जातं. पारितोषिक मिळविण्यासाठी मुलेही चांगलीच कामाला लागतात. महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षामुळे ढासळू लागले असताना या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या उद्देशाने काही संस्था, मंडळ ‘किल्ले बांधणी’ स्पर्धेच्या माध्यमातून या उपक्रमांना बळ देत असतात. सध्या बाजारात रेडीमेड किल्लेही आले असतात मात्र रेडीमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्गपरंपरेचं जतन, किल्ल्यांच्या बांधणीबाबत, इतिहासाबाबत तरूणांना माहिती व्हावी आणि एका इमारतीत राहणाऱ्या पण आपल्या दिनचर्येत व्यस्त असणाऱ्या नागरीकांनी थोडा वेळ काढून किल्ला बनविण्यासाठी एकत्र यावे या उद्देशाने किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते. किल्ल्यांचे परिक्षण करतेवेळी सहभागी स्पर्धकांना किल्ला बनवण्याबाबत तर माहिती विचारण्यात येतेच पण त्याचबरोबर मुळ किल्ल्याचा इतिहास, त्याच्या बांधकामातील वैशिष्ट्ये, तसेच त्याचे ऐतिहासीक घडामोडींमध्ये असलेले महत्त्व इ. गोष्टी विचारण्यात येतात. जेणेकरून स्पर्धकांना किल्ल्याविषयी अधिकाधिक माहिती होते. – तन्मय गोखले, दुर्गप्रेमी

महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची दिवसेंदिवस होत असलेली दुरावस्था लक्षात घेता तरूण पिढी पर्यंत या किल्ल्यांबाबत योग्य ती माहिती पोहोचवून त्यांच्यात देखील या विलक्षण दुर्गपरंपरेच्या संवर्धनाची भावना निर्माण व्हावी हा देखील हेतू या स्पर्धेमागे असतो. – केदार पाध्ये, टिळकनगर गणेशोत्सव मंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -