घरताज्या घडामोडीआजपासून १८ वर्षांखालील मुले करू शकणार लोकलने प्रवास

आजपासून १८ वर्षांखालील मुले करू शकणार लोकलने प्रवास

Subscribe

प्रवास करताना ओळखपत्र आणि मासिक पास सोबत ठेवणे अनिवार्य

अत्यावश्यक कर्मचाऱ्यासोबत लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. दसऱ्याच्या मुहूर्तावर आजपासून अठरा वर्षांखालील लहान मुलांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी रेल्वेकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सूचनेनंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने अठरा वर्षांखालील मुलांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकलने प्रवास करण्यासाठी या मुलांना मासिक पासच घ्यावा लागणार आहे. मासिक पास घेण्यासाठी पुरावा म्हणून ओळखपत्र तिकीट खिडकीवर दाखवावे लागेल त्यानंतर मासिक देण्यात येईल. प्रवास करताना ओळखपत्र आणि मासिक पास सोबत ठेवणे अनिवार्य असेल असे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण न झाल्याने त्यांना लोकलने प्रवास करता येत नाहीये. मात्र राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत त्याचप्रमाणे २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयीत विद्यार्थ्यांना प्रवास करणे कठीण होत असल्याने राज्य सरकारने रेल्वेशी चर्चा करुन १८ वर्षांखालील मुलांना लोकल प्रवास करण्यासाठी परवनागी दिली आहे.

- Advertisement -

लवकरच २ ते १८ वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईत जवळपास ३० लाख मुलांच्या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. लहान मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी मुंबई पालिकेने मोहीम हाती घेतली असून यात पालक आणि मुलांनी देखील पुढाकार घेऊन लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि १८ वर्षांखालील लहान मुले वगळता इतर कोणालाही वैद्यकीय कारणासाठी लोकलने प्रवास करता येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा म्हणून दाखवावा लागेल त्यानंतर त्या व्यक्तीला मासिक पास देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 vaccination for children: ३० लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -