Covid-19 Vaccine: मुंबईत आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर होणार? जाणून घ्या

केंद्र सरकारच्या आदेशानेच कोविडला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून याप्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले होते. या लसीकरण मोहीमेत आधी प्राधान्य गट, त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे, ३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

children vaccination corona vaccine covaxin for 6 to 12 years bharat biotech get dcgi approval
children vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय! 5 वर्षांच्या मुलांना Corbevax, 6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार Covaxin

केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईत आज, १६ मार्चपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईतील १२ समर्पित केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजेपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. या १२ समर्पित लसीकरण केंद्रांचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून, आवश्यक सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन महापालिकेच्या आणि शासनाच्या सर्वंच केंद्रांवर १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानेच कोविडला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून याप्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले होते. या लसीकरण मोहीमेत आधी प्राधान्य गट, त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे, ३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

आता, १२ ते १४ या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी महापालिका हद्दीतील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच १२ ते १४ वयोगटातील मुलांची त्या-त्या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.

१ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० पूर्वी जन्‍मललेली मुले या लसीकरणासाठी पात्र असतील. १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना Corbevax ही लस हातावर स्‍नायूमध्‍ये देण्‍यात येणार आहे. सदर लसीच्‍या २८ दिवसाच्‍या अंतरावर दोन मात्रा देण्‍यात येणार आहे. सद्यस्थितीत केंद्र शासनामार्फत कोविन प्रणालीमध्‍ये या लसीकरणासंदर्भात आवश्‍यक बदल उद्या सकाळपर्यंत होणे अपेक्षित आहेत.

सदर लसीकरण मुंबईतील १२ समर्पित केंद्रावर आज दुपारी १२ वाजता सुरु करण्‍यात येईल. कोविन प्रणालीत आवश्‍यक बदल झाल्‍यानंतर महापालिकेच्‍या सर्व लसीकरण केंद्रांवर सदर लसीकरण सुविधा उपलब्‍ध होईल. केंद्र शासनामार्फत कोविन प्रणाली अद्ययावत करण्‍याचे काम सुरु असल्‍यामुळे १२ वर्ष पूर्ण न झालेल्‍या मुलांचीदेखील लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते, परंतु पालकांनी आपल्‍या १२ वर्ष पूर्ण झालेल्‍याच पाल्‍यास लसीकरण करुन घ्‍यावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

१२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटासाठी मुंबईतील समर्पित लसीकरण केंद्रांची यादी

१) ई विभाग – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल

२) ई विभाग – ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल

३) एफ/उत्तर विभाग – लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)

४) एफ/दक्षिण – राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय, परळ

५) एच/ पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बी. के. सी.) जंबो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व)

६) के/पूर्व – सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व),
७. के पश्चिम – डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)

८) पी/दक्षिण – नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगांव (पूर्व)

९) आर/ दक्षिण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम)

१०) एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)

११) एम / पूर्व विभाग – पंडीत मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी

१२) टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड


हेही वाचा – Mumbai Corona Update : मुंबईत आज कोरोनाचे 50 नवे रुग्ण, तर 60 जण कोरोनामुक्त