घरट्रेंडिंगचीनी बहिष्काराचा ट्रेंड भारतात टॉपला; दुसरीकडे चीनी मोबाईल आऊट ऑफ स्टॉक!

चीनी बहिष्काराचा ट्रेंड भारतात टॉपला; दुसरीकडे चीनी मोबाईल आऊट ऑफ स्टॉक!

Subscribe

चायनीस प्रॉडक्ट्स इन डस्टबिन हा ट्रेंड भारतात आज टॉप ट्रेंडमध्ये...

चीनच्या मोबाईल एप्लिकेशन पाठोपाठच चीनी वस्तूंच्या वापराविरोधात सोशल मिडियावर ट्रेंड दिसून येत आहे. भारत चीन सीमा वादानंतर यासाठी आणखी बळ मिळाले आहे. पण दुसऱीकडे विरोधाभासाचे चित्रदेखील सोशल मिडियावर पहायला मिळाले आहे. ते म्हणजे चीनी मोबाईल कंपन्यांनी जाहीर केलेल्या सवलतीनंतर मोठ्या प्रमाणात भारतीय हे मोबाईल खरेदी करण्यासाठी पसंती दाखवली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्येच स्मार्टफोन्स विकले गेल्याचा ट्रेंड समोर आला आहे.

आज टॉप ट्रेंडिंगमध्ये #BoycottChineseProducts 

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंटिया ट्रेडर्सने आज आवाहन करत चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तर सोशल मिडियावरही चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यांचा ट्रेंड प्रकर्षाने समोर आला आहे. चायनीस प्रॉडक्ट्स इन डस्टबिन हा ट्रेंड भारतात आज टॉप ट्रेंड होता. अनेक भागात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे फोटो नेटीजन्सने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तर काही ठिकाणी चीनच्या झेंड्याची होळी, चिनी वस्तुंची जाळपोळ असे प्रकारही समोर आले आहेत.

- Advertisement -

चीनला धडा शिकवण्याच्या दृष्टीने सोशल मिडियावर समांतर हॅशटॅग वापरून ट्रेंडदेखील सुरू झाले आहेत. फेसबुक तसेच ट्विटर या दोन्ही सोशल मिडियाचा वापर यासाठी करण्यात आला आहे. रोजच्या वापरातील वस्तू फेकून तसेच त्याची जाळपोळ करून चीनविरोधातला बहिष्कार लोकांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही चीनी खाद्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

दोन दिवसांपासून #BoycottChineseProducts टॉपला!

एकीकडे चीनविरोधात राग व्यक्त होत असला तरीही दुसरीकडे मात्र वनप्लस या चीनमध्ये तयार होणाऱ्या स्मार्टफोनच्या नव्या मॉडेलच्या खरेदीसाठी मात्र भारतीयांची एकच झुंबड उडाली. अवघ्या काही मिनिटातच वनप्लस ८ प्रो हा मोबाईल आऊट ऑफ स्टॉक झाला. त्याचवेळी दुसरीकडे ट्विटरवर #BoycottChineseProducts हा भारतात टॉप ट्रेंड होता. गेल्या दोन दिवसांपासून हा ट्रेंड भारतात ट्विटरवर टॉपला आहे. भारतीयांकडून चीनच्या सीमेवरील भूमिकेवर राग व्यक्त होत असतानाच दुसऱीकडे मात्र भारतीयांनी मोबाईल खरेदीला पसंती दिल्याचे पहायला मिळाले आहे.


बायकॉट चायनाचा शोध अ्राणि बोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -