घरमुंबईआपल्या पक्षातील लोकांकडे कानाडोळा करणं शोभत नाही, चित्रा वाघ यांचा महापौरांवर हल्लाबोल

आपल्या पक्षातील लोकांकडे कानाडोळा करणं शोभत नाही, चित्रा वाघ यांचा महापौरांवर हल्लाबोल

Subscribe

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी बोरिवलीत ही घटना घडली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या सर्व प्रकारावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या घटनेचा संदर्भ देत, तेव्हा तुम्हाला त्यांचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असा सवाल केला. तसेच तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असंही चित्रा वाघ यांनी विचारलं. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं थोबाड फोडण्याची भाषा करताना आपल्या पक्षातील अशा लोकांकडे कानाडोळा करणं तुम्हाला शोभत नाही. असे खडेबोल चित्रा वाघ यांनी महापौर यांना सुनावले.

- Advertisement -

या प्रकरणात कोणीच आरोपींना पाठीशी न घालता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता कसून चौकशी करावी. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. ज्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात ही घटना घडली, त्या नगरसेविकेने पोलिसांना यासंदर्भात माहिती देणारं पत्र दिलं आहे. तसेच पीडित महिला ही नगरसेविकाला या गुन्ह्यात खोटं अडकवण्याची धमकी देत असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. पीडिता धमकी देत असली तरी आम्ही तिच्या बाजूने आहोत, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आणि गुन्हेगाराला त्याच्या चुकीचे शासन त्याला मिळालेच पाहिजे.


मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर – महापौर

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -