सिडकोची नागरिकांना दिवाळी भेट; 7,849 घरांची लॉटरी जाहीर

तुम्ही सुद्धा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर सिडकोने 7 हजार 749 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे आणि घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दिवाळीची भेट दिली आहे.

cidco

स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि परत्येकजण त्यासाठी कष्ट करत असतो. घराचं तुमचं स्वप्न पूर्ण कारण्यासाठी सिडकोने ऐन दिवाळीत तुम्हाला एक आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या दिवशी जर का तुम्ही सुद्धा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर सिडकोने 7 हजार 749 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे आणि घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईत हक्काचं घर तुम्ही खरेदी करू शकता.

स्वस्तात घरे मिळणार
सिडको कडून हरणासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ही जाहीर केलेली घरे नवी मुंबई मधील खारकोपर आणि बामणडोंगरी इथे आहते. ट्रान्सहार्बर रोड जवळ हा प्रकल्प तयार होणार आहे. दरम्यान या घरांच्या लॉटरीसाठी इच्छुकांना उद्यापासून नोंदणी करता येणार आहे. दरम्यान सिडकोने ऑगस्ट 2022 मध्ये काढलेल्या 4 हजार 158 घरांच्या नोंदणीसाठी 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी मुंबई मधील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघरमध्ये ही घरे आहेत. नागरिकांना परवडतील या दारात ही 4158 घरांपैकी 404 घरे ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी आणि 3 हजार 754 घरे सर्वसाधारण वर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यात 145 व्यापारी गाळ्यांचीही लॉटरी काढण्यात आली होती. त्यामुळे या दिवाळीत सिडको कडून नागरिकांना घरांच्या रूपाने दिवाळीची भेट देण्यात येत आहे.


हे ही वाचा – पंतप्रधान मोदी कारगिल दौऱ्यावर, जवानांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा