घरमुंबईप्रकाश मेहतांच्या कार्यालयाला घेराव, माहुलवासीयांचा आक्रोश

प्रकाश मेहतांच्या कार्यालयाला घेराव, माहुलवासीयांचा आक्रोश

Subscribe

माहुलसारख्या प्रदूषणकारी परिसरातील घरे बदलून सुरक्षित ठिकाणी स्थलातरित करण्याच्या मागणीसाठी रविवारपासून माहुलवासीय आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाला पाच दिवस झाले तरी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या माहुलवासीयांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता महेता यांच्या कार्यालयाला घेराव घालत जोरदार आंदोलन केले.

विद्याविहारमधून जाणार्‍या तानसा जलवाहिनीलगतच्या झोपडीधारकांना माहुलमध्ये स्थलांतरित केल्याने माहुलमधील 500 कुटुंबीय विद्याविहार येथील त्यांच्या घराच्या जागेवर आंदोलनाला बसले आहेत. माहुलवासीयांच्या या आंदोलनाची दखल शिवसेना व आप या पक्षांकडून घेण्यात आली असून, त्यांनी त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी माहुलवासीयांना म्हाडाच्या कोट्यातील 300 घरे देण्याची तयारीही दर्शवली.

- Advertisement -

पण भाजपचे नेते व गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी माहुलवासीयांनी बुधवारी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला होता. माहुलवासीय महेता यांच्या घरी गुलाब देण्यासाठी गेले होते. परंतु त्यांची भेट झाली नसल्याने गुरुवारी त्यांनी महेता यांच्याशी सकाळपासून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने व त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून साहेब भेटतील असे पोकळ आश्वासन मिळत असल्याने अखेर सायंकाळी 6 वाजता माहुलवासीयांनी प्रकाश महेता यांच्या कार्यालयाला घेराव घालत जोरदार आंदोलन केले. मात्र रात्री उशीरापर्यंत प्रकाश महेता कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्यालयात बसलेले भाजपच्या कार्यकर्त्यांनी समोरून कार्यालयाचा दरवाजा बंद करून मागच्या दाराने पळ काढला. परंतु प्रकाश महेता यांना भेटल्याशिवाय माघार घ्यायाचा नाही असा ठाम निर्धार करून माहुलवासीय त्यांच्या कार्यालयाबाहेर रात्री उशीरापर्यंत बसून होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -