घरताज्या घडामोडीदहिसर, पोयसर नद्या पुनर्जीवित करा - आदित्य ठाकरे

दहिसर, पोयसर नद्या पुनर्जीवित करा – आदित्य ठाकरे

Subscribe

मुंबईतील झाडांचे गुगल मॅपिंग होणार

मुंबईतून शहरातून वाहणाऱ्या पोईसर व दहिसर नदी सुशोभीकरण व पुनर्जीवित करण्यासाठी आज आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. दोन्ही नद्यांचे प्रदुषण कमी करण्याच्या अनुषंगाने जलदगतीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या. आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे तसेच रिव्हर मार्चच्या ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. आजच्या बैठकीत नदी परिसरात बांधलेल्या २० तबेल्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. उपनगरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिंडोशी ते कांदिवली – लोखंडवाला, वर्सोवा, आदर्श नगर ते मालाड, आरे कॉलनी या रस्त्यांच्या कामाला गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याबाबत तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दोन्ही नद्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणारे प्रदुषण पाहता तातडीने याठिकाणी कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

मुंबईतील झाडे आता गुगल मॅपवर

दहिसर नदी पुनर्जीवित कण्यासाठी साबरमतीच्या नदीच्या धर्तीवर पर्यटन विकास करण्याच्या अनुषंगाने या नदीचे सुशोभीकरण करावे अशीही सूचना त्यांनी यावेळी दिली. दहिसर नदीच्या किनाऱ्यावर रिव्हर फेस्टिव्हलचे आयोजन करावे. तसेच मुंबईतील झाडांचे गुगल मॅपिंग करावे अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या.

माय ग्रीन बीन

Green BIN
माय ग्रीन बिन

आदित्य ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘माय ग्रीन बीन’ या उपक्रमाचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यास मदत होणार आहे. ‘आपला कचरा आपली जबाबदारी’ याचे भान ठेऊन प्रत्येक नागरिकाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे जेणेकरून आपले शहर स्वच्छ होण्यास मदत होईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


हे ही वाचा – देशभरात ७०० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -